फॅबटेक पॉलिटेक्निक तर्फे पूल कॅम्पस द्वारे २३ मुलींची निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला :जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी असे थोरा मोठ्यांनी सांगून ठेवलं आहे पण आता त्यात भर घालून जिच्या हाती तंत्रशिक्षणाची जोड ती सर्वांनाच गोड असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

त्याचे असे झाले की, फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये जिकेएन फोकर्स एल्मो इंडिया कंपनीच्या अधिकारी चैत्राली पाटेकर यांनी डिप्लोमा इले्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील मुलींसाठी पूल कॅम्पसचे आयोजन केले होते. या पूल कॅम्पससाठी श्रीराम पॉलीटेक्नीक पानीव, कर्मयोगी पॉलीटेक्नीक शेळवे , स्वेरी पॉलीटेक्नीक पंढरपूर या कॉलेज मधील मुलींनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये डिप्लोमा विभागातील मुलींसाठी टेक्निकल टेस्ट, तांत्रिक कौशल्य व मुलाखत या निवड प्रक्रिये द्वारे २३ मुलींची निवड करण्यात आली असून फॅबटेक मधील वैष्णवी कुंभार, भक्ती वाडकर, कविता खांडेकर, श्रेया कारंडे, धनश्री सावंत, व वैष्णवी बिराजदार या सहा विद्यार्थिनींना ,वार्षिक कमीत कमी दीड लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे.

तेसच श्रीराम पॉलीटेक्नीक पानीव येथील कर्णावर सावित्रा नवनाथ ,क्रांती शत्रुघ्न काळे, मनाली कुलकर्णी ,रुतुजा मरळ,ऋतुजा जगताप, कर्मयोगी पॉलीटेक्नीक शेळवे येथील गायत्री शशिकांत क्षीरसागर, निकिता युवराज गायकवाड, केस्कर प्रतिक्षा ईश्वर, पवार प्रतीक्षा तात्या, भोसले अमृता भीमाराव, साक्षी राजू चौगुले, पिसे नेहा दत्तात्रय तसेच स्वेरी पॉलीटेक्नीक पंढरपूर येथील वैष्णवी अरविंदकुमार टोणगे, मेघा मुरलीधर सुकळे, अलीशा अहमद शेख, सुरैया मकबुल पठाण, गौरी मुकुंद जाधव अशा एकूण २३ मुलींची या कॅम्पस ड्राईव्ह मार्फत निवड करण्यात आली.

सदर मुलींची चाकण येथील जीकेएन या मल्टी नॅशनल एरोस्पेस कंपनी मध्ये निवड झाल्याने संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्ट, श्री अमित रुपनर , कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, प्राचार्य प्रा.शरद पवार , इले्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा.महेश वाळूजकर यांनी अभिनंदन केले.हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी पार पद्मासाठी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ.साहेबगौडा संगनगौडर व डिप्लोमाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर प्रा.तन्मय ठोंबरे यांनी परिश्रम घेतले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here