राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके व त्यांच्या सहकार्‍यांवर 420 अंतर्गत पंढरपूर मध्ये गुन्हा दाखल (डिझेल अपहार प्रकरणी गुन्हा दाखल)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव, राष्ट्रवादीचे नेते तथा विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालकेंसह अधिका-यांसह चौघांवर पंढरपुरात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गैरव्यवहारातून हा गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपूर तालुक्याचा राजवाडा असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असताना गैरव्यवहार करता यावा यासाठी भैरवनाथ पेट्रोलीयम सरकोली येथून कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेल खरेदी करुन ८ लाख ३६ हजार ५३ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करीत रोपळे येथील विलास पाटील यांनी पंढरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर नुकतीच सुनावणी झाली असून प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश खरोसे यांनी पंढरपूर तालुका पोलिसांना सीआरपीसी 156/3 प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिला आहे.

यानुसार मंगळवारी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला भगिरथ भालके, बी पी कर्पे सह भैरवनाथ पेट्रोलपंपाचे मालक, व्यवस्थापक यांचेवर भादवि कलम १२० ब, ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७अ, ३४ सह गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याच्या वतीने पेट्रोलपंप चालवण्यात येत आहे. तरीही या पंपावरुन पेट्रोल व डिझेलचा वापर न करता भैरवनाथ पेट्रोलपंपावरुन कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेलची खरेदी केली. या बदल्यात विठ्ठल कारखानेतर्फे भैरवनाथ पेट्रोल पंपाला ८ लाख ३६ लाख ५३ रुपये अडवान्स देण्यात आला. व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा विलास पाटील यांनी आरोप केला.

याची चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे मागणी न्यायालयात ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. ओंकार बुरकुल यांच्यामार्फत केली होती. न्यायालयात यावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने पोलिसांना सीआरपीसी १५६(३) प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रमाणे आज मंगळवारी रात्री चेअरमन भगीरथ भालके, प्रभारी कार्यकारी संचालक बी.पी. कर्पे, पेट्रोलपंपाचे मालक व व्यवस्थापक आदी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here