विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने भीम जयंती साजरी तृतीय पंथीयांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती पंढरपुरात विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थ येथे आयोजित या जयंती उत्सव सोहळ्यात तृतीय पंथी दिशा व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी भूषविले.तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा साधना भोसले,मा.नगरसेविका शकुंतला नडगिरे,सुप्रिया डांगे आदी उपस्थित होते.

      तर सायंकाळी भीमशाहीर देविदास बंगाळे यांचा  निळं वादळ हा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी दिली. 

   यावेळी दीपक चंदनशीवे,सूरज पावले,मोहन ढवळे,मीराताई सरवदे, शैलजा तोंडसे आदी उपस्थित होते.          

 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती समितीचे अध्यक्ष सुरेश नवले,अनिल ननवरे सर,नितीन काळे,आण्णा धोत्रे,आनंद थोरात,रामदास सर्वगोड,विलास जगधने सर, राबिया शेख,रेहाना आतार,आदम बागवान,आशाताई बागल,रुपेश वाघमारे,रमेश सासवडकर,गजानन शिंदे,तानाजी मोरे,संतोष बंडगर, प्रकाशबुवा अभंगराव,गणेश काळे,विना वाघमारे,मेजर बंगाळे,जमीर तांबोळी,सागर वाघमारे,बंडूराजे भोसले,   यांच्यासह विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे विविध पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here