आय.पी.एल.ऍग्रो कंपनीकडून केली ऊस पिकावर ड्रोन द्वारे फवारणी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अशा प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ऊसशेतीत करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा: रणजीत(भैय्या) शिंदे

टेंभुर्णी येथे आज मंगळवार दिनांक 12/4/2022 रोजी सकाळी 9 वाजता बारामती येथील आय.पी.एल. ऍग्रो कऺपनीच्या चातक ड्रोन द्वारे ऊस पिकावर ड्रोन द्वारे फवारणी कार्यक्रम श्री.बऺकट गायकवाड यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा.श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री. लगडसाहेब यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.

त्यावेळेस त्यांनी सांगितले की, एका वेळेस दहा लिटर औषधांमध्ये केवळ पाच ते सात मिनिटांमध्ये एका एकराची फवारणी करता येते. ड्रोनचे भाडे एका एकरासाठी सातशे रुपये असून शेतकऱ्यांनी ग्रुप शेतीमध्ये एकत्र फवारणी केल्यास ड्रोन द्वारे फवारणीसाठी येऊ शकतो. अशा प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ऊसशेतीत करून जास्तीत जास्त एव्हरेज काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांनी केले.

यावेळी बेंबळे येथील प्रगतिशील शेतकरी सोमनाथ हुलगे, प्रशांत गायकवाड, टेंभुर्णीचे बंकट गायकवाड, राजाभाऊ थोरात विकास थोरात शिवाजी येवले पाटील , पत्रकार श्री. पवार श्री.वाघमारे , कारखान्याचे ओव्हरशिअर बळीराम नलवडे तसेच परिसरातील गावाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here