फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलजमध्ये ‘हॅकेथॉन २०२२’ संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला येथील फॅबटेक कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभाग यांच्यावतीने  ‘हॅकेथॉन २०२२’ संपन्न झाला. राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम महाविद्यालयीन स्तरावर ‘हॅकेथॉन’ आयोजित करून. त्यातून प्रस्ताव निवडून त्यांचे सादरीकरण करा, असा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे.        याच अनुषंगाने कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाच्या वतीने तृतीय  व अंतिम वर्ष बी टेक विद्यार्थ्यांकरिता ‘हॅकेथॉन २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असे एकूण  ११ ग्रुप्स तयार करण्यात आले होते. यामध्ये २८ मुली व ३८ मुले एकूण ६६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर त्यातील ४८ विद्यार्थ्यांचे ८ ग्रुप पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आले. या याविषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे म्हणाले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२  हा शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात व आपल्या नवकल्पनांचा, आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करतात. जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल.        

हॅकेथॉन २०२२ ही स्पर्धा  संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  व  प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप  यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुख प्रा. पराग दौंडे यांनी केले. त्यांना  प्रा. मिलन शेटके व प्रा. गजानन काळे यांचे सहकार्य लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here