चैत्रीशुध्द यात्रा काळात यात्रेकरुंनी काळजी घ्यावी मुख्याधिकारी-अरविंद माळी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चैत्रीशुध्द यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात यात्रेकरुंनी स्वच्छतेची काळजी घ्यावी असे, आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे  मुख्याधिकारी अरविंद माळी  यांनी केले आहे.

 दिनांक 06  ते 20  एप्रिल 2022 या कालावधीत चैत्री यात्रा होणार असून, दिनांक 12  एप्रिल 2020 रोजी चैत्री शुध्द एकादशी आहे. या यात्रा कालावधीत यात्रेकरुंनी पंढरपूर येथे आल्यावर सार्वजनिक जागेत घाण करु नये, शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. सार्वजनिक ठिकाणी, नदीपात्र अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये. नदीपात्रात  वाहने, जनावरे धुवू नयेत तसेच कचरा टाकू नये.   नदीचे पात्र प्रदुषीत होईल असे कृत्य करणाऱ्या विरुध्द  मुंबई पोलीस कायदा कलम 115 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.असे मुख्याधिकारी माळी यांनी सांगितले.

यात्रेकरुंनी नदीचे, बोअरचे पाणी पिऊ  नये. नळाचे पाणी प्यावे, कच्ची फळे, शिळे अन्न खाऊ नये. सार्वजनिक रस्ता किंवा मोकळया जागेत कचरा न टाकता कचरा पेटीत टाकावा.  दशमी, एकादशी, व्दादशी या दिवशी सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळेमध्ये कचरा गाडी येईल.  कचरा गाडीतच कचरा टाकावा. तसेच शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. यात्रा कालावधीत यात्रेकरुंनी व नागरिकांनी स्वच्छता व  आरोग्य विषयक काळजी घ्यावी असे आवाहनही मुख्याधिकारी माळी यांनी केले आहे.    

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here