खरे पैलवान धनंजय महाडिकच!पण विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी सभासदांनीच लावला लंगोट! षंढ राजकारण थांबवा (प्रा.संग्राम चव्हाण)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार म्हणजे सभासदांनी सभासदांच्या हितासाठी चालवलेली सभासदांची संस्था होय. भीमा ही सहकारी संस्था सभासदांच्या मालकीची आहे.संपूर्ण देशातील साखर कारखानदारी अडचणीत असताना भीमा पुढील अडचणी समजून घेणे तर दूरच परंतु मार्गात नवनवीन अडथळे निर्माण करून कारखाना बंद कसा पडेल यासाठी प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या भीमा बचाव संघर्ष समितीच्या काही असंतुष्ट आत्म्यांना संस्थेचे 1078 सभासद रद्द करण्याचा घाणेरडा खेळ खेळण्याची उपर्ती सुचली. सभासद वाढवून किंवा कमी करून सहकाराचे राजकारण करणे म्हणजे “षंढतेचे राजकारण” झाले.दमदार राजकारणा साठी लोकांचा विश्वास जिंकावा लागतो.स्वतःला झळ लावून घ्यावी लागते.अविरत काम करावे लागते. हंगाम यशस्वी करण्यासाठी श्री.धनंजय महाडिक यांनी स्वतःची वडिलोपार्जित जमीन गहाण ठेवून पैसे उभे केले व मोठ्या जिद्दीने भीमा कारखाना अडचणीतून बाहेर काढला!मुन्नासाहेब महाडिक हे वास्तवामध्ये मेहनती व कसलेले खरे पैलवान आहेत.परंतु आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांना धोबीपछाड देऊन आसमान दाखवण्यासाठी मुन्ना साहेबांना लंगोट लावण्याची गरज नसून त्यांच्याआधी भीमाच्या सभासदांनीच अगोदरच लंगोट बांधला असून विरोधकांना भीमाचे सभासदच आसमान दाखवतील.भीमाचे 2160 सभासद रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस सोलापूर प्रा. संग्रामदादा चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वरील प्रमाणे प्रतिक्रिया दिली.

चौकट-
भीमाची निवडणूक बिनविरोध देऊन परिचारक व राजन पाटील यांनी परतफेड करावी

समोर पराभव निश्चित दिसत असताना भीमाची निवडणूक लावण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी करू नये. निवडणुकीपूर्वीच भिमाच्या सर्व सभासदांनी ही निवडणूक हातात घेतली असून भीमा पुन्हा एकदा महाडिक यांच्याच ताब्यात द्यायचा असंच सभासदांनी एकमताने मनापासून ठरवून टाकल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. निवडणूक बिनविरोध देऊन वेळेचा व संस्थेच्या पैशाचा अपव्यय व पुढील नामुष्कीही टाळावी.पंधरा वर्षापूर्वी महाडिक साहेबांनी स्वतःच्या वडिलांनी उभा केलेल्या भीमाची निवडणूक मोठं मन दाखवत आ.श्री सुधाकरपंत परिचारक व आ.श्री राजन पाटील यांना बिनविरोध दिलेली होती.आज परिचारक गट व राजन पाटील गट यांनी यंदाची भीमाची निवडणूक महाडिक साहेबांना बिनविरोध देऊन त्यावेळी दाखविलेल्या संस्थेच्या काळजीपोटी दाखविलेल्या खिलाडू वृत्तीची परतफेड करण्याची हि योग्य वेळ आली आहे. महाडिक यांनी कारखान्याची प्रगती करून दाखवली आहे. करणाऱ्याला करू द्यावे. असं मला वाटतं. बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयाचे सर्व सभासद मनापासून स्वागत करतील.या निर्णयामुळे सर्वांचाच मानसन्मान अबाधित राहील व घाणेरड्या राजकारणाचा सामान्य सभासदांना त्रास होणार नाही.भीमा हा राजकारणाचा अड्डा होऊ न देता भीमाने सुद्धा पांडुरंग व लोकनेते कारखान्याप्रमाणे राजकारण विरहित राहून पुढील प्रगती साधावी अशी सर्व सभासदांची इच्छा आहे.
(प्रा.संग्राम चव्हाण समन्वयक)
(भीमा परिवार)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here