महसूल विभागाच्या मनमानीमुळे माढा येथील ‘प्रशासकीय भवन’ इमारतीचे कामास विलंब.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महसूल खात्याच्या अक्षम्य ,गलथान , दुर्लक्षित , बेफिकीर व वेळ काढू कामामुळे माढा येथे पंधरा कोटी रुपये खर्चून होणारे ‘प्रशासकीय भवन ‘हे सर्वसामान्य जनतेसाठी एक दिवास्वप्नच ठरते की काय अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
वृत्तांत असा की माढा तालुक्यातील 109 गावातील नागरिकांची कोणतीही शासकीय कामे एकाच इमारतीत व्हावीत या उद्देशाने माढा तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या जागेवर पंधरा कोटी रुपये खर्चून एक भव्य असे प्रशासकीय भवन व्हावे अशी तालुक्यातील जनतेची अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे., त्यानुसार या इमारतीसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले आहेत .ही इमारत माढा येथील तहसील कार्यालयाच्या जागेवर होणार असून सध्याचे तहसील कार्यालय काही कालावधीसाठी इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मालकीची इमारत ठरवून दिलेली आहे .परंतु अधिकृत समजलेली माहिती अशी की वरिष्ठ पातळीवरून महसूल खात्याच्या अक्षम्य दिरंगाई मुळे या इमारतीचा भाडेपट्टा तयार होण्यास विलंब लागत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या इमारती साठी 75 हजार रुपये महिना म्हणजेच वर्षाला नऊ लाख रुपये भाडे मागणी होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा अहवाल माढा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे पाठवलेला आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांनी यासाठी माढा येथे अनेक वेळा भेट दिली व पाहणी केली आहे परंतु ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला समजून येत नाही. रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचे जागेचे मेन्टेनन्स रिपोर्ट ठरवण्यासाठी शासनाकडूनच पाहणी होऊन मंजुरी मिळावी लागते असं सांगून तहसील कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य शासनाकडे फक्त टोलवाटोलवी केली जात आहे. प्रशासकीय भवन इमारत तातडीने तयार व्हावी म्हणून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना मध्ये शासनाकडून 10 कोटी रुपये निधीची तरतूद झालेला आहे. माढा तहसील कार्यालयाच्या जागेवर अगदी तातडीने जरी इमारतीचे काम सुरू करायचं म्हटलं तरी या दहा कोटी मधील रक्कम खर्च करता येत आहे परंतु रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचा भाडेकरार तयार करणे या साध्या कामासाठी महसूलच्या तालुका व जिल्हा विभागाने अक्षम्य दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे ही वस्तुस्थिती आहे .वास्तविक पाहता तहसील कार्यालयाच्या जागेवर भव्य अशी तीन मजली ‘प्रशासन भवन’ इमारत तयार झाल्यानंतर या ठिकाणी तालुक्यातील महसूल, कृषी ,फॉरेस्ट, सिटी सर्वे, ट्रेझरी, दुय्यम सहाय्यक निबंधक, सहाय्यक निबंधक अशी महत्त्वाची सर्व कार्यालये एकाच इमारतीत येऊन कार्यरत होणार आहेत व यामुळे तालुक्यातील कोणत्याही नागरिकास आपल्या शासकीय कामासाठी माढा येथे आल्यास एकाच ठिकाणी आपली सर्व कामे करून घेता येतील व प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात तो त्रास व नाहक भुर्दंड वाचेल ही सत्य ही वस्तुस्थिती आहे. प्रशासकीय भवन, माढा तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तातडीने व्हावी म्हणून या तालुक्यातील लाखो नागरिक वाट पाहत आहेत परंतु ही अक्षम्य दिरंगाई केवळ महसूल खात्याची असल्यामुळे ही इमारत होण्यास निश्चित विलंब होत आहे, याबाबत आता वरिष्ठ पातळीवर विचार होणे गरजेचे आहे.
तहसील कार्यालयाची जागा चांगली आहे, शासनातर्फे पंधरा कोटी पैकी दहा कोटी निधी मिळालेला आहे सुरुवातीला टोकन अमाऊंट देखील एक कोटी रुपये मिळाली आहे आणि हे सगळं होऊन सुद्धा केवळ महसूल खात्याच्या दप्तर दिरंगाई मूळे जर प्रशासकीय भवन इमारतीस उशीर लागत असेल तर जनतेला वेगळा विचार करावा लागेल. राज्य शासनाने तातडीने लक्ष घालावे व माढा मध्ये होणाऱ्या इमारतीसाठी जिल्हा महसूल कार्यालयाकडून तातडीने हालचाली व्हाव्यात एवढीच सर्व सामान्य जनतेलला अपेक्षा आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here