संत दामाजी सहकारी कारखाना “साखर उता-यात” जिल्ह्यात दुसऱ्या नंबरवर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने चेअरमन आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली ऊसाची बिले, कर्मचाऱ्यांचे पगार, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेवर देऊन विश्वास संपादन करत यंदाचा हंगाम यशस्वीरित्या पार पाडला आहे.

या हंगामात ३ लाख ८५ हजार ०६० मे.टन गाळप करुन ३ लाख ९७ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

“साखर उताऱ्यात” कारखाना सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला असल्याची माहिती मंगळवेढा कृषी उत्पन्न समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.

श्री.संत दामाजी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ सालच्या २९ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ आवताडे यांचे प्रमुख उपस्थितीत व व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक कार्यकारी संचालक रमेश गणेशकर यांनी केले.

ऊस तोडणी वाहतूकदारांचा केला सत्कार

या कार्यक्रमात ऊस तोडणी वाहतुकीचे विक्रमी काम केल्याबद्दल ठेकेदार समाधान शिंदे, लक्ष्मण गरंडे, दयानंद गरंडे, दामाजी बंडगर, अशोक शिंदे, तुकाराम लवटे,

प्रताप शिंदे, जितेंद्र लेंडवे, तात्यासो घोडके, वसंत दोलतडे, योगेश चंदिले, अजिनाथ वारे, दादा सानप, सोमनाथ सातपुते यांचा सत्कार करण्यात येऊन प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here