पुरोगामी संघर्ष परिषदेचा कराड येथे “संघर्ष” मेळावा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एकविसाव्या शतकात मागास वर्गीय व अठरापगड जातींच्या समूहाला वेगवेगळ्या अन्यायाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे अन्यायाचा संघर्ष करण्याच्या पद्धतीत कसा बदल करायचा यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय संघर्ष मेळाव्याचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजन केले असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हा वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिली आहे
बुधवार दिनांक 30 मार्च रोजी कराड (जि.सातारा ) यशवंतराव चव्हाण स्मृती सदन ( टाऊन हॉल ) या ठिकाणी होणाऱ्या “संघर्ष” मेळाव्याला उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा,कोल्हापूर, सोलापूर, पुणे,मुंबई ,धुळे ,नंदुरबार, जळगाव,अहमदनगर या जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याचे सांगितले. मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी कराड शहरातून फुले ,शाहू ,आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे रॅलीने अभिवादन करतील त्यानंतर शेवाळेवाडी (तालुका कराड )या ठिकाणी संघटनेच्या तीन नामफलकाचे अनावरण राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते होऊन ते सातारा जिल्ह्याच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करतील.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here