पंढरपूर तालुक्यातील सूस्ते गावात एका शेतकऱ्यास बेदम मारहाण! (पंढरपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्यासह चोघांवर शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील सूस्ते गावात एका शेतकऱ्यास बेदम मारहाण!

(पंढरपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्यासह चोघांवर शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

 

शेतीच्या वादातून पंढरपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केली असल्याची घटना १६ मार्च २०२२ रोजी पंढरपुर तालुक्यातील सूस्ते गावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धनंजय भारत घाडगे हे आपल्या कुटुंबासह शेती गट नंबर ४३५ मध्ये गेले होते. त्यावेळी तेथे दिलीप तुकाराम घाडगे,अभिजीत दिलीप घाडगे, सौरभ संजय घाडगे, संजय तुकाराम घाडगे, अनिल तुकाराम घाडगे, सोमनाथ धोंडीबा माने, रवींद्र नारायण जाधव, आणि रूचिक रवींद्र जाधव यांनी लाठी काठ्यांनी बेदम मारहाण केली.

या शेतात जर पुन्हा पाऊल ठेवल्यास जिवंत ठेवणार नाही असा दम देऊन धनंजय घाडगे यांच्या उजव्या डोळ्यावर मारहाण केली.अभिजीत घाडगे याने काठीने,दगडाने हातावर पायावर मारहाण केली यामध्ये धनंजय घाडगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

धनंजय घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिलीप आप्पा घाडगे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर भादवि १४७,१४८,१४९,३२६,३२३,४२७,५०४,५०६ आणि १३९ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांनीच अशा प्रकारे एका शेतकऱ्याला मारहाण केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती ही खरी कष्टकरी शेतकऱ्यांचीच आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून विचाला जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here