जागतिक वन दिनानिमित्त पंढरपूरातील वाल्मिकी सेतूवर आलेल्या झाडाला पुष्पहार घालून गांधीगिरी पध्दतीने केले आंदोलन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महर्षी वाल्मिकी संघाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला खरमरीत शब्दात शुभेच्छा! 

पंढरपूरातील चंद्रभागा नदीवरील महर्षी वाल्मिकी पुलावर (सेतूवर) उगवून आलेल्या झाडाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे महर्षी वाल्मिकी संघाकडून गांधीगिरी पध्दतीने त्या झाडा बद्दल आंदोलन करण्यात आले. 

21 मार्च जागतिक वन दिनाचे औचित्य साधत महर्षी वाल्मिकी संघाकडून या झाडाला पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. 

कित्येक दिवसांपासून हे झाड या पुलावर उगवून आले आहे. एक नाहीतर अनेक झाडे या पुलावर उगवून आले आहेत आणि त्याची उंची जवळपास 5 फुटापर्यंत झाली आहे. तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे म्हणून आम्ही गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले असं महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले आहे. 

लाखो, करोडो रूपये खर्च करून हा पुल बांधण्यात आला आहे. पण अशी झाडे जर पुलावर येत असतील तर या पुला ला ही झाडे धोकादायक ठरू शकतात यामुळे पुलावर मोठी दुर्घटना घडू शकते. पण या झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार म्हणून आज या सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी पुलावर झाडे लावण्याचे काम हाती घेतले आहे. 

असा उपक्रम सबंध महाराष्ट्र शासनाने सुरू करावा अश्या खरमरीत शब्दात गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केल्याचे गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.

याप्रसंगी माऊली भाऊ आधटराव, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, सुरज अभंगराव, दिगंबर कांबळे, अर्जुन इंगळे, दिपक अभंगराव, श्रीकांत ननवरे, महादेव संगीतराव, पुंडलिक गुळखेडकर, आबा आधटराव आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here