विरोधकांनीच भीमापुढे अडचणी निर्माण केल्या!अडचणी निर्माण करणाऱ्या पोरकट प्रवृत्तींना खतपाणी का घातले?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(विरोधकांना संग्राम सरांचा खडा सवाल!)

टाकळी सिकंदर आणि परिसराची आन-बान- शान आणि सभासदांची “जान” असलेल्या स्वर्गीय भीमरावदादा महाडिक यांनी स्थापन केलेल्या व जुन्या काळात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी अडचणींतून सावरलेल्या व अलीकडे त्याच भीमरावदादांचे चिरंजीव मुन्नासाहेब महाडिक यांनी जीवाचे रान करून प्रसंगी स्वतःची वडिलोपार्जित खाजगी जमीन गहाण ठेवून वाढवलेल्या व परिसराची वरदायिनी ठरलेला भीमा कारखान्याच्या मार्गात कारखाना बंद पडावा या स्वार्थी हेतुने एकामागून एक अशा शेकडो अडचणी निर्माण करत सुटलेल्या भीमा बचाव समितीसारख्या पोरकट प्रवृत्तींना खतपाणी का घातले? अडचणीतील संस्थांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करणाऱ्या सहकारातील जबाबदार मंडळींनी ह्या प्रवृत्तींना वेळीच का रोखले नाही?भीमा बंद पडावा यासाठीचे प्रयत्न घृणास्पद वाटले नाहीत का? एक्सपान्शन व
कोजनरेशन पूर्ण करताना संस्थेवर व्याजाचा ताण आला असताना,साखर उद्योगापुढे दुष्काळी परिस्थिती,कोरोना संकट, एनपीएचा प्रश्न तसेच कोसळलेले साखरेचे भाव यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीच्या वेळी “बोळात गाठून” कारखाना आणखी अडचणीत कसा येईल यासाठी कट कारस्थान रचणा-या हावरट व पोरकट प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या व भीमा विषयी खोटा पुळका दाखवणाऱ्या मंडळींना अडचणीतील संस्थांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्याचा नैतिक अधिकार उरलेला का? अडचणीही तुम्हीच निर्माण करणार व एकत्रही तुम्हीच येणार हा कुठला न्याय? हा दुटप्पी पणा न कळण्याइतका भीमाचा सभासद बाळबोध आहे का? आगामी निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होणार कि तिरंगी लढत होणार? कोण कोणाबरोबर हातात हात घालून जाणार? यामध्ये भीमाच्या सभासदांना आता बिल्कुल स्वारस्य उरले नसून गोडाउन मध्ये साखर असून साखरच गायब झाल्याचा धादांत खोटा आरोप करून सभासदांची चालू ऊस बिले बंद पाडण्याचे पाप करणाऱ्या विरोधी प्रवृत्तींना भिमाच्या सुज्ञ सभासदांनी पुरते ओळखले असून त्यांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड देऊन व धुळ चारून स्वर्गीय भीमराव दादांच्या चिरंजीवाच्या हातातच भीमा कारखाना पुन्हा एकदा सोपविण्यासाठी सर्व सभासदांनीच लंगोट लावला असून चेअरमन श्री.धनंजय महाडिक हेच भीमासाठी ख-या आस्थेने काम करणारे योग्य नेतृत्व असून कारखान्या पुढील अडचणी सोडवून प्रगती साधण्यासाठी समर्थ नेतृत्वही आहे. भिमाच्या सभासदांना जिल्ह्यात सर्वात जास्त “टॉप वन”चा दर देतील याबाबत सर्व सभासदांना विश्वास वाटतो. स्व. भिमरावदादा व स्व. सुधाकरपंत परिचारक व विद्यमान चेअरमन संसदपटू व संसदरत्न खासदार मुन्नासाहेब या तिघांचे कार्यपद्धती मध्ये खूप साम्य असून या सर्वांचे भीमा कारखान्यासाठी चे योगदान सभासद कधीही विसरणार नाहीत. चेअरमन श्री.धनंजय महाडिक यांनी अडचणीच्या काळात सुद्धा उभ्या केलेल्या नव्या कारखान्याची व सह विद्युत निर्मिती प्रकल्पाची सभासद मतांच्या पेटीतून पोहोच पावती दिल्याशिवाय राहणार नाहीत.आगामी निवडणूक ही फक्त एक औपचारिकता राहिलेली असून भीमा परिवाराचा विजय हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. विरोधकांनीच निवडणूक लावताना सभासदांच्या मानसिकतेचा एकदा नाही दोनदा नाही शंभर वेळा अंदाज घ्यावा अभ्यास करावा व मगच निवडणूक लावावी आणि वेळ व पैशाचा अपव्यय टाळावा व पुढील नामुष्की टाळावी असे महत्वपूर्ण प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.यावेळी सर्व संचालक मंडळासह पवन भैय्या महाडिक,सतीश आण्णा जगताप, शिवाजी गुंड पाटील,रहीम बक्ष, पांडुरंग अण्णा बचुटे, संतोष बचुटे, तांबोळी,भीमराव वसेकर,सिद्धेश्वर बापू अनुसे,पोपट सरपंच,सुनील चव्हाण,प्रा. संतोष पाटील,प्रा. राजकुमार पाटील,प्रा.बाबासाहेब जाधव, प्रा.माऊली जाधव भारत पाटील,धनंजय बाबासाहेब राजाराम बाबर, पांडुरंग तात्या ताठे, माणिक बाबर, बंडू बाबर ,चंद्रसेन जाधव, दिलीप उर्फ अनंता रामहरी रणदिवे,दादासाहेब शिंदे,सौ. शैलाताई गोडसे, डॉ. सुरवसे,महादेव आबा बाबर, कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब जगताप,पैलवान अन्सार भाई, जाकिरभाई मुलाणी, किसनबापु जाधव पंकज चव्हाण,आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here