फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित , फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये महान वैज्ञानिक सी. व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. संपूर्ण देशात 28  फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील महान वैज्ञानिक आणि  एक प्राध्यापक सी. व्ही. रामन यांनी  केलेले काम विज्ञानाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस विद्यार्थ्यांने उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर , संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे हे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी इयत्ता तिसरीतील हसनीन  तांबोळी ,ख्वाइश शर्मा व इयत्ता सातवीतील आदर्श स्वामी यांनी राष्ट्रीय  विज्ञान दिवस व सी वि रमण यांच्या बद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांनी राष्ट्रीय विज्ञान  दिवसाच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.  विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रयोग प्रमुख पाहुणे व उपस्थित पालक वर्ग यांनी कौतुकाने पाहिले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य वापरून विविध प्रकारचे प्रयोग बनवले होते. परीक्षक म्हणून प्रा.हनुमंत मलाड ,प्रा.सूरज निकते हे होते. यानंतर परीक्षकांनी  विद्यार्थ्यांना प्रयोगाबद्दल माहिती विचारली. या विज्ञान प्रदर्शनात पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शीतल लिगाडे यांनी केले. व आभार प्रदर्शन सौ.दिपाली कोठावळे यांनी केले . राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here