गवत लागवड ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – सुभाष बडवे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि.28 (जिमाका):- पंढरपूर वनक्षेत्रामध्ये मौजे कासेगाव वनवसाहत येथील सभागृहामध्ये वन विभाग सोलापूर आयोजित गवत लागवड कुरण विकास या विषयावर कार्यशाळा आयोजीत केलेली होती. या कार्यशाळेस सेवा निवृत्त वनसंरक्षक सुभाष बडवे यांनी सोलापूर वन विभागातील अधिकारी व कर्मचारी

  यांना गवत लागवड योजना व त्याचे महत्व या विषयी मार्गदशन केले.

        कार्यशाळेसाठी सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहा.वनसंरक्षक श्री. हाके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी असे एकूण पन्नास पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये शेडा (Sehima nervosum), मारवेल (Dichanthiun annulatum, Dichanthium aristatum, डोंगरी (Chrysopogonfulvus), लोखंडी (Eremopogon foveolatus), अंजन (Cenchrus ciliaris), धामण (Cenchrus setigerus), गीनी panicum maximum इ. गवतांची ओळख करून दिली. गवत बी उपलब्ध नसताना रुट स्लीप पासुन रोपवाटीका तयार करण्याचे तंत्र समजावुन सांगून त्यांचे शंका निरसन श्री. बडवे यांनी केले.

            गवत कुरण व्यवस्थापन या दुर्लक्षित विषयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण वीस कलमी कार्यक्रमामध्ये व राष्ट्रीय वन योजना 1988 मध्ये वृक्ष लागवडीला जास्त महत्व दिल्याचे दिसून येते. पवना, मारवेल,डोंगरी,गिन्नी,धामण, दिनानाथ अशा प्रजाती मुरमाड अवर्षण प्रदेशात कमी मेहनतीने घेणे शक्य होते. गवत लागवड केल्यामुळे जमिनीची धुप थांबते व भूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ होणयास मदत होते. गवत लागवडीमुळे शेतकऱ्याला मोठया प्रमाणात पशुधनासाठी आवश्यक असा चारा उपलब्ध होतो, अशी माहिती श्री. बडवे यांनी दिली.

            गवत परिसंस्थेमध्ये माळढोक, तणमोर, बहिरा ससाणा, कोल्हा , तरस, काळवीट, चिंकारा, गरूड, तितर, वटवटया, सरडा, फुलपाखरे हे वन्यप्राणी व बरेचसे किटक देखील आढळतात. नामशेष होत असलेल्या माळढोक सारख्या इतर माळरानावरील पक्ष्यांच्या सुरक्षितता व संवर्धनासाठी यातून हातभार लागेल. तसेच गवताची उत्पादकता ही कमी वेळामध्ये साध्य होत असल्यामुळे ही अल्पभुधारक शे तकऱ्यांसाठी, दुग्ध व्यवसासिकांसाठी, स्थलांतरीत होणाऱ्या भूमीहीन मेंढपाळांसाठी एक सुवर्णसंधी आहे, असे श्री. बडवे यांनी म्हटले.

            सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी गवत लागवड कुरण विकास कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केलेबद्दल सुभाष बडवे यांचे आभार व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here