औंढी येथे शिवजयंती उत्साहात साजरी! (प्रा, संग्राम दादा चव्हाण, विक्रांत भैय्या माने, भिमराव वसेकर यांच्या हस्ते शिवपूजन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

औंढी येथे शिवजयंती उत्साहात साजरी!

(प्रा, संग्राम दादा चव्हाण, विक्रांत भैय्या माने, भिमराव वसेकर यांच्या हस्ते शिवपूजन)

दरवर्षीप्रमाणे औंढी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील युवा नेते पांडुरंग बचुटे मित्र मंडळ तसेच शिवप्रतिष्ठान औंढी यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंतीनिमित्त औंढी मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी युवा नेता विक्रांत माने प्राध्यापक संग्राम चव्हाण तसेच श्री भिमराव वसेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवआरती मनोभावे आळवली गेली.
शिवजयंती चा सोहळा आयोजन हा औंढी करांचा एक कौतुकास्पद उपक्रम असून प्रत्येक नवीन पिढीला शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र समजले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या स्वभावातील स्त्रीदाक्षिण्य, धीरोदात्तपणा शौर्य,कर्तृत्व धाडस,दानशूरता,दूरदृष्टी या गुणांचे आजच्या तरुण पिढीने अनुकरण केले पाहिजे. असे उद्गार संग्राम चव्हाण यांनी या प्रसंगी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेता युवराज शिंदे यांनी केले. याप्रसंगी पांडुरंग बचुटे शांतीलाल आंबुरे प्रकाश बचुटे आनंद भुसे अंगद भुसे, तानाजी शिंदे, सागर भुसे विजय भुसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here