फॅबटेक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये  बारावीच्या विद्यार्थ्यांचा  निरोप समारंभ संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी  पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज  मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य प्रा. शरद पवार, एआय अँड डीएसचे विभागप्रमुख  डॉ. तानाजी धायगुडे, सिव्हिल विभागप्रमुख  डॉ. कनसे,प्रा.राजकुमार गावडे व कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील हे होते.

       निरोप समारंभ कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.  बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प  देऊन  परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांच्या मनोगतामध्ये प्राचार्य शरद पवार यांनी  अभ्यासातील आत्मविश्वास, वचनबद्धता आणि अभ्यासातील सातत्य या गोष्टींचे शालेय जीवनातील महत्त्व सांगितले. डॉक्टर तानाजी धायगुडे यांनी बारावीच्या यशासाठीचे मार्ग सांगितले.तर  डॉक्टर कनसे यांनी परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी व अभ्यासातील सातत्य याचे मार्गदर्शन केले. प्राचार्य सिकंदर पाटील यांनी विदयार्थांचा हा निरोप नसून भावी आयुष्याचा मार्ग आहे असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता  हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

 या  कार्यक्रमाचे नियोजन  इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुजा खटके व कु. हबीबा शेख यांनी केले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here