विनायक नाईकनवरे यांना 26 जानेवारी रोजी संचलनाचे नेतृत्व करण्याची संधी सत्कार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विनायक नाईकनवरे यांना 26 जानेवारी रोजी संचलनाचे नेतृत्व करण्याची संधी सत्कार!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्तीचा माजी विद्यार्थी श्री विनायक नाईकनवरे यांना 26 जानेवारी रोजी झालेल्या संचलनासाठी निवड झाल्याबद्दल व संचलनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्तीच्या वतीने समितीचे अध्यक्ष श्री मारुती शंकर कोळसे व उपाध्यक्ष श्री राधेश्याम हरिदास पाटील यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वस्तीवरील जेष्ठ नागरिक श्री शहाजी नाना कोळसे यांनी भूषवले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री धनाजी बोबडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री कैलास सोनवणे सर यांनी केले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जवळेकर, चिंचकर वस्ती या शाळेसाठी भूदान दिलेले श्री भिकाजी चिंचकर यांचे नातू श्री रितेश चिंचकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चिंचकर वस्ती परिसरातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते, शाळेतील विद्यार्थी कोरोना नियमाचे पालन करून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here