माढा ते शेटफळ रसत्यासाठी राज्य सरकार बरोबर केंद्रातूनही मिळाला;9 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आ.बबनदादा शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा ते शेटफळ रसत्यासाठी राज्य सरकार बरोबर केंद्रातूनही मिळाला;9 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आ.बबनदादा शिंद

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निधीतून माढा मतदार संघातील माढा ते शेटफळ या मुख्य रस्त्याच्या 17 किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली. आ. बबनदादा शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही दिवसांपूर्वी टेंभूर्णी ते कुसळंब या रस्त्यासाठी 157 कोटी रुपयांचा तर टेंभूर्णी शहरातील रस्त्यासाठी व आढेगाव पुलाच्या कामासाठी 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यातआला आहे त्यानंतर लगेचच त्यांनी हा निधी मंजूर केला असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. माढा व मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाच्या असलेल्या व दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आ. बबनदादा शिंदे यांनी केली होती. गेल्या काही दिवसांपासून याबाबत पाठपुरावा सुरू होता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडून अर्थसंकल्पामध्ये या कामासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती परंतु यासाठी वाढीव निधीची आवशयकता असल्याने केंद्रीय मार्ग निधी या योजनेमधूनही निधी मंजूर करावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचेकडे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मागणी केली होती या दोन्ही योजनांच्या माध्यमातून या रस्त्याकरिता निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पत्र केंद्रीय मार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आ.बबनराव शिंदे यांना पाठविले आहे.
माढा विधानसभा मतदरसंघातील रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी आमदार बबनदादा शिंदे नेहमी प्रयत्नशील असतात. हा मतदारसंघ पूर्णपणे ग्रामीण आहे.या भगातील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी त्यांचा नेहमीच जिल्हा परिषद,राज्य सरकार,केंद्र सरकार यांचेकडे विशेष पाठपुरावा सुरू असतो.निधी मंजूर केलेल्या या रस्त्यास वर्षानुवर्षे केवळ डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरू ठेवण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग कडून सुरू होता मात्र यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती त्यानुसार राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 5 कोटी व केंद्र सरकारच्या केंद्रीय मार्ग निधीतून 4 कोटी रुपये असे एकूण 9 कोटी रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आल्यामुळे हा सुमारे 17 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होणार आहे.या रस्त्यास निधी मंजूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here