१२ तासात गुन्ह्याचा तपास करून दरोडा, घातलेल्या व लहान मुलीचे अपहरण केलेल्या गुन्हेगारास तात्काळ अटक! (पी‌ आय मालोजीराजे देशमुख यांचे सर्व स्तरातून कौतुक)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

१२ तासात गुन्ह्याचा तपास करून दरोडा, घातलेल्या व लहान मुलीचे अपहरण केलेल्या गुन्हेगारास तात्काळ अटक!

(पी‌ आय मालोजीराजे देशमुख यांचे सर्व स्तरातून कौतुक)

 

 

 

रविवारी पहाटे मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्यालगतच्या वीटभट्टी कामगारांच्या राहत्या घरी चोरीचा डाव चोरांनी आखला व त्याचवेळी तेथील बालिकेचेही त्यांनी अपहरण केले.यामुळे मायणी परिसरात खळबळ माजली. परंतु पोलीस यंत्रणेकडून तातडीने राबवण्यात आलेल्या तपास यंत्रणेमुळे सदर अपहरण झालेली बालिका धोंडेवाडी,ता-खटाव याठिकाणी आरोपीच्या ताब्यातून सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला व १२ तासापासून चाललेल्या या सर्व प्रकारावर पडदा पडला.
याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र व पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे,दि .०६ / ०२ / २०२२ रोजीचे मध्य रात्री १.०० ते २.०० वा . चे दरम्यान मौजे गुंडेवाडीफाटा , गुडेवाडी , ता खटाव , जि . सातारा येथील विट भट्टी वरील मोल मजुरी करुन आपले कुटूंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या मजुरांचे घरात घरफोडी चोरी करुन सदर ठिकाणाहुन एका ६ वर्षाचे बालीकेचे अपहरण करुन तिला लपवून ठेवल्याच्या घटनेबाबतची खबर वडुज पोलीस ठाणे अंकित , मायणी पोलीस दुरक्षेत्र येथे प्राप्त होताच वडुज पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व मायणी पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस उप निरीक्षक श्रीमती शितल पालेकर यांना मिळताच, सदर अपहरीत बालीकेचा व आरोपीचा कसुन शोध घेतला असता मौजे धोंडेवाडी ता खटाव , जि . सातारा या ठिकाणी मजुरीसाठी आलेला इसम संशयित आरोपी रमेश सुरेश वाघमारे वय ३३ वर्षे रा . हाल , ता . खालापुर , जि . रायगड याचे ताब्यातुन अपहरीत बालीकेची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.
ताब्यात येताच बालीकेस तिचे आई वडीलांचे सुखरुप ताब्यात देण्यात आलेली आहे. सदर आरोपीस वडुज पोलीस ठाणे गु.र.नं. ३२ / २०२२ भा.दं. सं . ३६३ , ३६५ ४५७ , ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे . या आरोपीचे रमेश सुरेश वाघमारे वय ३३ वर्षे रा . हाल , ता . खालापुर , जि रायगड याने यापूर्वी अशाच प्रकारचे इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का? याबाबत अधिक तपास करणेकामी मा . न्यायालयाकडुन पोलीस कोठडीची मागणी करणात आली असल्याची माहिती मायणी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी दिली.
. अजय कुमार बन्सल , पोलीस अधिक्षक ,सातारा व अजित बोऱ्हाडे , अपर पोलीस अधिक्षक , सातारा यांचे सुचनांप्रमाणे . डॉ . निलेश देशमुख , उप विभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग , कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल पालेकर , पोलीस अंमलदार पो हवा . नाना कारंडे , पो.ना. दिपक देवकर , पो.ना. कृष्णा साळुंखे , पो.ना. भुषण माने , पो . ना . अमोल चव्हाण , पो.कॉ. योगेश सुर्यवंशी , पो.कॉ. महेंद्र खाडे यांनी सदर कारवाई केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल पालेकर या करीत आहेत .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here