‘फार्मसी शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष पाहणी करावी’- वनराई ग्रुपच्या संस्थापिका सौ. वर्षा चंकेश्वरा 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
 
 
स्वेरी फार्मसीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण संपन्न
 
 
पंढरपूर- ‘आयुर्वेदिक वनस्पतींची पुढच्या पिढीला ओळख व्हावी व आपल्या सभोवताली असणाऱ्या अशा औषधी वनस्पती आपल्याला ओळखता याव्यात. या उद्देशाने आयुर्वेदिक वनस्पती व रोपांचे वृक्षारोपण स्वेरी फार्मसीमध्ये करण्यात आले. कोरोना कालावधीत झालेल्या वातावरणीय बदलामुळे उद्भवणाऱ्या अनेक संसर्गजन्य आजारावर घरगुती व इतर दुष्परिणाम रहित आयुर्वेदिक उपचारांसाठी अशा वनस्पतींचा वापर आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो वर्ष आपल्या देशात सुरु आहे. परंतु, नवीन पिढीला अशा आयुर्वेदिक उपचार पद्धतींची व त्यात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींची माहिती नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना या औषधी वनस्पती प्रत्यक्ष पाहता याव्यात. त्यांची शास्त्रीय नावे व त्यांचे उपयोग विद्यार्थ्यांना कळावे यासाठी हा उपक्रम राबविला आहे.’  असे प्रतिपादन वनराई ग्रुपच्या संस्थापिका सौ. वर्षा चंकेश्वरा यांनी केले.  
         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या भव्य प्रांगणात ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या ६० दुर्मीळ औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले.  संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने  बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली हे वृक्षारोपण पार पडले. पंढरपूर मधील चेतना बहुउद्देशीय संस्था संचलित वनराई ग्रुप तर्फे वृक्ष संगोपन आणि वृक्ष जतन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पंढरपूरच्या वनराई ग्रुपच्या संस्थापिका सौ. वर्षा चंकेश्वरा, विश्वजित चंकेश्वरा, विधी उपाध्ये व त्यांचे सहकारी स्वेरीत वृक्षारोपण करण्यासाठी आले होते. त्यांनी फार्मसी कॉलेज कॅम्पसमध्ये अडुळसा, गुडमर, करमाळ मोह, महारुख, कांचनार, इन्शुलीन, लेमन बसील, मिंट बसिल, कर्पूर, तुलसी, ब्लॅक पेपर, पळस, अर्जुन, बाहवा, तमन, बकुळ अशा विविध स्वरूपाच्या दुर्मिळातील दुर्मीळ होत चाललेल्या ६० औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड केली. लावलेल्या रोपांजवळ त्या रोपांची माहिती असलेले फलक देखील लावण्यात आले. नैसर्गिक देणगी असलेल्या पक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या वृक्षांची संख्या कमी होत आहे. हे पाहून पंढरपुरातील वनराई ग्रुप ‘एकच ध्यास, वृक्षांचा हव्यास’ या धोरणाने ठिकठिकाणी उपक्रम राबवून वृक्षांचे महत्व पटवून देत आहे. यासाठी ठिकठिकाणी पक्षांच्या संगोपनासाठी वृक्षरोपण करत आहेत. यावेळी सौ. चंकेश्वरा पुढे म्हणाल्या की, ‘आज रस्ते, परिसर  जागा यासाठी झाडांच्या कत्तली होत आहेत तर कांही ठिकाणी दाट सावली मिळते म्हणून वृक्षारोपण केले जात आहे. परंतु त्यांची जोपासना केली जाते का ? हे ही पाहणे महत्वाचे आहे. म्हणून जेथे वृक्ष जोपासना केली जाते अशा ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करतो. पक्षांसाठी आवश्यक असणारी झाडे, वृक्ष लावले तर निसर्गाने दिलेल्या विविध रंगांचे पक्षी भविष्यात पाहण्यास मिळतील. यासाठी औषधी रोपांची व गरजेच्या वृक्षांचे रोपण करून प्रथम पक्षांना वाचविणे गरजेचे आहे. यासाठी हा उपक्रम आम्ही ठिकठिकाणी राबवीत आहोत. दाट सावली देणारे वृक्ष लावण्यापेक्षा पक्षांना आवश्यक असणारी झाडे लावण्याची गरज आहे. सध्या आम्ही एक लाख वृक्ष लावण्याचे उद्धीष्ठ ठेवले असून त्यानुसार वाटचाल सुरु आहे.’ असे सांगून वनस्पतींची माहिती दिली. यावेळी प्रा. रामदास नाईकनवरे, युवराज पवार आदी उपस्थित होते. 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here