माझ्या समोर आलेल्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी 353 चे कितीतरी गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरणार नाही:- दत्तात्रय मस्के -पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती व शेतकरी संघटनेचे दत्ताभाऊ म्हस्के यांनी सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये समोरच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी 353 चा गुन्हा दाखल झाला तरी प्रहार संघटना घाबरणार नसल्याचे यावेळी सांगितले.
माझ्यावर आज पर्यंत सात पेक्षा जास्त 353 चे गुन्हे दाखल असून हे सर्व गुन्हे मी फक्त शेतकऱ्यांसाठी अंगावर झेलले असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव लढत राहणार असून राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने इथून पुढे जिल्ह्यात मोठे काम करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी दत्तात्रय मस्के-पाटिल यांनी केले.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की कारखान्याच्या काटा मारी च्या बाबतीत मी सर्वांना आवाहन केले होते पण या सर्व कारखानदारांनी प्रत्येक का ठेवलेला दम भरला असून त्यामुळे कुणीही उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे वजन करायला तयार नाही हे फक्त कारखानदार शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम करतात या कारखानदारांना चांगलाच चाप बसला पाहिजे अशी प्रतिक्रिया दत्तात्रय मस्के पाटील यांनी सर उपस्थितांसमोर दिली.
2007 पासून मी चळवळीत काम करतो आहे माझ्यावर अनेक गुन्हे दाखल असून मी यापुढेही घाबरलो नसल्याचे यावेळी त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना सांगितले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी,जिल्हाउपाध्यक्ष रमेश पाटील, शहर अध्यक्ष खालिद मनियार, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, संपर्कप्रमुख सागर पवार, युवा तालुकाध्यक्ष विकी मोरे, जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण, उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, तालुका उपाध्यक्ष प्रवीण, तालुका कार्याध्यक्ष शाहरुख शेख व प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here