पंढरपूर येथे दोन गावठी पिस्तुल जप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

ऐन सणासुदीच्या दिवसात पंढरीत गावठी पिस्तुल जप्त

पंढरपूर येथे ऐन संक्रात सणाच्या दिवसात दोन युवकांकडे गावठी पिस्तुल आढळल्याने खळबळ उडाली आहे, गुन्हे शाखा प्रकटीकरण च्या पोलिसांनी कारवाई करून दोन्ही युवकास अटक केली आहे आणि दोन्ही पिस्तुल ,काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी शनिवार दि १५जानेवारी रोजी अजय बाळकृष्ण खाडे हा युवक(रा. मंगळवेढा) गोपाळपूर रोडवरील रिद्धीसिद्धी गणपती मंदिर येथे गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्री अरुण पवार यांना मिळाली होती तसेच रविवार दि १६जानेवारी रोजी गणेश रमेश शिंदे(रा. संतपेठ,पंढरपूर,)हा युवक कॉलेज रोड भागातील हॉटेल श्रीकृष्ण जवळ गावठी पिस्तुल व काडतुस घेऊन येणार अशी माहिती मिळाली होती, यावरून त्याला अटक करण्यात आली, दोन्ही युवकांवर भा दं वि ३,७,२५नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डी वाय एस पी विक्रम कदम,पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदूम,राजेश गोसावी,बिपीन ढेरे, इरफान मुलाणी,हेंबाडे, पठाण,माने,पाटील,बनसोडे, केवळे यांच्या पथकाने केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here