कै.वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस सौ सविता ताई गोसावी यांनी दिली सदिच्छा भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(सर्व कार्याची व ट्रेंडची केली प्रशंसा)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी ता.पंढरपूर येथे आज सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग व विशेष घटक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या वसंतराव काळे एम.एस.सी.आयटी प्रशिक्षण केंद्रास वाखरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सविताताई गोसावी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ.संगीतताई काळे वाखरीच्या सरपंच सौ.कविताताई पोरे युवा नेते यशराज काळे, प्रथमेश गोसावी यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीप्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सुरू असलेल्या सर्व ट्रेंडला भेट देऊन प्रात्यक्षिक कार्याची पाहणी केली व ग्रामीण भागात अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून मुलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी दर्जेदार व्यवसायिक शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील मुलांना व्यवसायिक शिक्षणाची उपलब्ध असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य संतोष गुळवे सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here