कल्याणराव काळे यांच्या कुटील डावास फसू नका

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(सिताराम कारखान्यातील गुंतवणूकदारांना ॲड. दिपक पवारांचे आवाहन)

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि मध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व शेतकरी, ठेवीदार व गुंतवणूकदारांना आवाहन करतो की आपण सर्वांनी सिताराम महाराज कारखान्यामध्ये गुंतवणूक करून १० वर्ष होऊन गेली आहेत. आपण सर्वांनी वारंवार मागणी करून देखील आजवर कोणासही कारखान्याने ना लाभ दिला,ना परतावा दिला,ना मूळ रक्कम परत केली. मी आपल्या सर्वांच्या वतीने २० ऑक्टोंबर २०२१ रोजी सेबी, ईडी, कंपनी निबंधक, इन्कम टॅक्स, पोलीस अधीक्षक सोलापूर,उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व गुंतवणूकदारांची पंढरपूर येथे बैठक घेतली व सर्व गुंतवणूकदारांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कल्याणराव काळे व सिताराम कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हा दाखल करा व आमच्या हक्काचे पैसे परत द्या म्हणून तीव्र निदर्शने केली.
आपल्या तक्रारी बाबत पोलीस विभागाने तसेच कंपनी मंत्रालय, भारत सरकार यांनी गंभीर दखल घेऊन तपास चालू केला आहे. आता कल्याणराव काळे यांच्या लक्षात आले आहे की, लोकांचे पैसे परत करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याचा एक केविलवाणा प्रयत्न म्हणून मागील दोन दिवसापासून कल्याणराव काळे चेअरमन असलेल्या सहकार शिरोमणी कारखान्याचे चिटबॉय हे गुंतवणूकदारांकडे जाऊन “ चेअरमन साहेब तुमचे पैसे चार दिवसात परत करणार आहेत, त्यासाठी अर्जावर सही मागत आहेत, तसेच पावती, बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्ड मागत आहेत.” परत एकदा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न कल्याणराव काळे यांच्याकडून सुरू असून त्यांना कोणीही कसलेही सहकार्य करू नये. आपल्या सर्वांचे गुंतवणूक केलेले पैसे व्याजासह परत करण्याचा आदेश सेबी व कंपनी निबंधक करतील याची जाणीव

कल्याणराव काळे यांना झालेली आहे. त्यामुळे आपल्याला कोट्यावधी रुपयांचे व्याज, परतावा त्यांना द्यावा लागणारआहे व तो द्यावा लागू नये म्हणून कल्याणराव काळे यांची ही धडपड सुरू आहे आपल्या सह्या घेऊन,बँक पासबूक घेऊन काही लोकांच्या खात्यावर केवळ मूळ मुद्दल जमा करतील व सर्वांचे पैसे दिले असल्याचा दिखावा करून जोरात सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया ढिली पाडण्याच डाव कल्याणराव काळे यांनी आखला असून तो हाणून पाडण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करायचे आहे.
तरी सर्व गुंतवणूकदारांना, ठेवीदारांना, शेतकऱ्यांना माझे नम्र आवाहन आहे की आपण गुंतवणूक करून ११ वर्ष वाट पाहिली आहे अजून थोडा धीर धरा. आपण गुंतवलेल्या रकमेच्या सुमारे तिप्पट रक्कम आपणास मिळवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही. लवकरच त्याबाबतीत संबंधित विभाग आदेश करतील त्याबाबत आपण निश्चिंत रहा.काळे यांचे जे लोक आपणाकडे कागदपत्र मागण्यासाठी व सह्या घेण्यासाठी येतील त्यांना विचारा की तुम्ही नक्की किती रक्कम परत करणार आहात ? आम्ही गुंतवणूक केलेली रक्कम अधिक व्याज अशा एकूण होणाऱ्या रकमेचा चेक घेऊन या, आमच्या खात्यावरती व्याजासह रक्कम जमा झाल्याशिवाय आम्ही कागदपत्रे देणार नाही अथवा सही करणार नाही असे ठणकावून सांगा.असे केले तरच आपल्या सर्वांचे हक्काचे पैसे व्याजासह परत मिळतील.याबाबतीत जर कोणी जबरदस्ती किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क साधा मी आपल्या साठी हजर असेन अशी ग्वाही देखील देतो.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here