ओबीसी आरक्षणात भाजप म्हणजे झारीतले शुक्राचार्य :प्रकाश वाले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने प्रभाग क्रमांक 19 निलम नगर येथे जनजागरण अभियान व माजी नगरसेवक विनोद गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्द्घाटन सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाच्या मार्गात भाजप झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावत आहे. वारंवार मागणी केलेला इंपेरिकल डेटा देण्यात जाणूनबुजून चालढकल करत भाजप ओबीसी आरक्षणात खोडा घालत आहे. ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याच कामच भाजपने केले आहे.” अशा घणाघाती शब्दात भाजपवर तोफ डागली.
ते पुढे म्हणाले की, केंद्रापासून ते सोलापूर महानगर पालिकेपर्यंत सर्वच ठिकाणी भाजप सपशेल अपयशी ठरली आहे. केंद्राच्या धोरणामुळे जवळपास सव्वाशे रुपये पेट्रोल आणि साडे नऊशे रुपये गॅस झाला आहे. या सर्वांचाच परिणाम प्रत्येक जीवनावश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडण्यात झाला आहे. इथे स्थानिक पातळीवर येथील सत्ताधारी भाजप जनतेला साधं पिण्याचं पाणी पोटभर देऊ शकत नाहीये. सगळीकडून सामान्यांची पिळवणूक सुरू आहे. शहरातील रस्त्यांबद्दल तर सगळाच आनंदीआनंद आहे.

जनजागरण सभेचे आयोजन विनोद गायकवाड यांनी केले होते.

सभेला शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चेतन नारोटे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मनोहर माचर्ला, सतीश संगा, शंकर अंजनाळकर, शुभम माने, राकेश मंथेंन, कुंदन गायकवाड, लालू सानी, देविदास येलदी, नरेश महेश्वरम, रमेश वडनाल, शिवानंद बळोरगी, गोविंद श्रीराम, नामदेव कुनी, नागेश कामूर्ती, अमृत आडकी, श्रीनिवास कन्ना, लक्षण पासकांती, व्यंकटेश सब्बन, सूर्यकांत आरके, गोविंद मादगुंडी, राजू बोड्डू, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here