“सामाजिक कार्य करण्यासाठी चांगला दृष्टिकोन असावा लागतो.” 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
सकाळीच शाळेला निघालेल्या दोघा बहिणींनी शालेय दप्तर बाजाराच्या पिशवीत आणलेल्याचे बघून, त्या दोघींना गाडीवर बसवून गावातील एका दुकानातून दोघींना चांगल्या प्रकारच्या सॅक घेऊन दिल्या व राहिलेल्या एका बहिणीला ही एक सॅक घेऊन देऊन मा.ग्रा.सदस्य गणेश बागल यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी..
आपल्या समाजातील गरीब व श्रीमंतीची दरी आजही वरचेवर वाढत चालली आहे. गरीब-गरीब च होत चालला आहे, तर श्रीमंत श्रीमंतच.. अशा परिस्थितीत आपण समाजातील गरीब, गरजू व निराधार लोकांना मदत केली पाहिजे. एकीकडे लाखो रुपये भरून पालक शिक्षणासाठी खर्च करत आहेत. तर दुसरी कडे शालेय साहित्य घेण्यासाठी ही पैसे एखाद्या पालका कडे पैसे नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून आपण यापुढे गादेगांव पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना 1जानेवारी 2022 पासून “गादेगांव सोशल फाऊंडेशन” या आपल्या सामाजिक संस्थेमार्फत मोफत शैक्षणिक साहित्य व इतर मदतीचे वाटप करणार आहे, तरी शैक्षणिक साहित्य अभावी कोणाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण यापुढे पुढाकार घेणार असल्याचे मा.ग्रा.सदस्य गणेश बागल यांनी सांगितले. कोणतेही सामाजिक कार्य एकट्याने होत नसते त्यासाठी सर्वांची मदत होणे गरजेचे असते. या कामासाठी आपण आपल्या मित्र मंडळी व सहकार्यांची ही मदत घेणार आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here