राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचं महाविकास आघाडीला आव्हान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. ते पुण्यातील सभेत बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेवर निशाणा साधताना 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा आरोपही लगावला. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन – दोन हात करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलेय. 

राज्यातील सरकारने पेट्रोल स्वस्त करायचं सोडून दारु स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल का स्वस्त केले नाही. देशभरातील राज्याने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केली. पण महाविकास आघाडी सरकारने दारुवरील कर कमी केला, असा आरोपही अमित शाह यांनी केला. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here