जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हे प्रकटीकरण यांची कामगिरी ८,७०,८८० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हे प्रकटीकरण यांची कामगिरी सराफ दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक ८,७०,८८० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर – जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री घरफोडी प्रकार वाढले होते . त्या अनुषंगाने घरफोडी गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेकामी मा . पोलीस आयुक्त श्री हरीश बैजल , पोलीस उप आयुक्त श्रीमती वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री माधव रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणेचे बाळासाहेब भालचिम व पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते . त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेट पोलीस ठाणे सोलापुर यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उप निरीक्षक केतन मांजरे यांचे पथकास आदेशीत केले होते . नमुद पथकाने जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं. ५४१/२०२१ भा.द.वि.कलम २०१,३८०,४५४ , ४५७ , ४११,५११ प्रमाणे दाखल गुन्हयातील सराफ बाजार , पूर्व मंगळवार पेठ , सोलापुर येथील गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन गुन्हयाचा तपास सुरु केला . तपासा दरम्यान आरोपींनी सराफ दुकानात चोरी करण्यासाठी चारचाकी वाहनाचा उपयोग केले असल्याचे समजले . सदर चारचाकी वाहन हे जि . जालना दिशेने गेले असल्याचे समजले असता आम्ही पथकासह जि . जालना येथे जावून तेथील स्थानिक पोलीसांची मदतीने अश्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची स्थानिक गुप्त बातमीदारांकडुन माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा संजुसिंग कृष्णासिंग भादा , दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक व भारतसिंग कपुरसिंग बावरी सर्व रा . गुरुगोविंदसिंग नगर , जि . जालना या तिघांनी मिळुन केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली . मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसम भारतसिंग कपुरसिंग बावरी यांस जि . जालना येथुन शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे कबुल केले . तसेच सदरचा गुन्हा करणेकरीता त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातुन नमुद चारचाकी वाहन चोरले असल्याचे सांगितले . त्यानंतर त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचे पोलीस कोठडी दरम्यान चोरलेल्या चांदीच्या दागिनेबाबत तपास केला असता चोरलेल्या चांदीच्या दागिनेपैकी काही .चांदीचे दागिने त्यांचेकडुन हस्तगत केले असुन चोरलेल्या चांदीच्या दागिनेपैकी काही चांदीचे दागिने हे त्याने जि . जालना येथे राहणारा त्याच्या ओळखीचा सोनार राहुल वडगांवकर यास विक्री केले असल्याचे सांगितले . त्यानंतर राहुल वडगांवकर यांस ताब्यात घेऊन त्याचेकडुन देखील काही चांदीचे दागिने हस्तगत करुन त्यास देखील नमुद गुन्हयात अटक केले आहे . आरोपी नामे भारतसिंग बावरी यांस विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने व त्याचे दोन साथीदार संजुसिंग कृष्णासिंग भादा , दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे मिळुन नमुद चारचाकी वाहनाचा वापर करुन वाशिम जिल्हयात सराफ बाजारात चोरी केल्याची कबुली दिली आहे . सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी आज रोजीपर्यंत एकुण १० किलो ३४८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली चारचाकी मोटारवाहन क्र . MH२० BN २४६ ९ ही जप्त करुन एकुण ८,७०,८८० / रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . सदर गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन याबाबत अभिलेख तपासला सदर सदरबाबत जि . औरगांबाद मधील क्रांति चौकतंतंतं पोलीस ठाणे , औरंगाबाद शहर गु.र.नं. ६५३/२०२१ भा.द.वि.कलम ३७ ९ मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे . नमुद गुन्हयातील पाहिजे असलेले दोन आरोपींचा शोध घेणे सुरु आहे . सदर तपासा दरम्यान खालीलप्रमाणे एकुण ३ गुन्हे उघडकीस आणले आहे १ ) जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं. ५४१ / २०२१ भा.द.वि. कलम २०१,३८० , ४५४ , ४५७ , ४११ , ५११ . २ ) क्रांति चौक पोलीस ठाणे औरंगाबाद शहर गु.र.नं .६५३ / २०२१ भा.द.वि. कलम ३७ ९ . ३ ) कांरजा शहर पोस्टे . जि.वाशिम गु.र.नं. ०८ ९ ४ / २०२१ भा.द.वि. कलम ४६१,३८०

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री हरीश बैजल , पोलीस उप आयुक्त श्रीमती वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री माधव रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बाळासाहेब भालचिम व पोलीस निरीक्षक , राजेंद्र करणकोट यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे , पोहेकॉ / १११६ आबा थोरात , महिला पोहेकॉ ९ ७५ सरोज शिंदे , पोना / ६२८ सुरेश जमादार , पोना / १२७४ अतुल गवळी , पोना / १२६८ आय्याज बागलकोटे , पोकॉ / १५३३ सोमनाथ थिटे , पोकॉ / १६ ९ राजेश घोडके , पोकॉ / १५७१ बाळु माने यांनी बजावली आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here