मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योग-व्यापार सेलच्या वतीने 12 डिसेंबर रोजी परिवार संवादाचे आयोजन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती रहावे:नागेश (दादा) फाटे)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभागाच्यावतीने देशाचे राष्ट्रीय नेते माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंढरपूरचे उद्योगपती राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश (दादा) फाटे यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले असून रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजून दहा मिनिटांनी पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम (काका) साठे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक (आबा) साळुंखे पाटील प्रदेश प्रवक्ते नरखेडचे उमेश (दादा) पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भगीरथ (दादा) भालके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश (दादा) पाटील, उपाध्यक्ष युवराज (दादा) पाटील, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, शहराध्यक्ष सुधीर (भाऊ) भोसले, मा.सौ. संगीता माने शहराध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस,मा.सौ. राजश्री ताड तालुकाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस,मा.श्री. लतिफभाई तांबोळी,सह.स्टार प्रचारक, प. महाराष्ट्र, मा.श्री. सुधाकर कवडे, संचालक स.शिं.वसंतराव काळे सह.सा. कारखाना,आदी सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी सर्व सेलच्या पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश (दादा) फाटे यांनी सर्वांना केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here