मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील MSEB डी.पी. चा शॉक बसून जखमी झालेल्या मुलाला नुकसान भरपाई देऊन तसेच या डीपीला सुरक्षाकवच चा करण्यात यावे :- प्रकाश वाले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ येथे राहणाऱ्या राजु अमित डावरे वय दहा वर्ष असून त्याला MSEB च्या दुर्लक्षामुळे तेथील डीपी उघडा असून त्यामुळे त्या मुलाला शॉक बसला आहे. शॉक बसलेला मुलगा ४५% टक्के भाजला असून सदर मुलाचा बसवेश्वर हॉस्पिटल येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असून तो मुलगा गरीब कुटुंबातील आहे तरी त्या मुलाला MSEB च्या वतीने लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी व तसेच डी. पी. सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी कार्यकारी अभियंता महावितरण सोलापूर यांना देण्यात आले.
यावेळी प्रशांत सोनवणे, साहिल मस्के, मिलिंद सुरवसे, राजन निकाळजे, हार्दिक सुरवसे, अक्षय पाटील, अप्पू नवडे, सचिन सूर्यवंशी, राकेश सरवदे, अजित बनसोडे साक्षात महिंद्रकर आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here