सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सुपर मार्केट येथील त्यांच्या आर्ध्याकृती पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव किसान मेकाले गुरुजी यांच्या हस्ते गटनेते चेतन नरोटे व नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर,सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, माजी नगरसेवक मधुकर आठवले उपाध्यक्ष रामसिंग आंबेवाले डॉ आप्पासाहेब बगले सुमनताई जाधव प्रमिला तुपलवडें शोभा बोबे राजेश झांपले परशुराम सत्तरवाले लखन गायकवाड संजु गायकवाड चंदाताई काळे बंसती सांळुखे दत्ता सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.