विविध पदांच्या भरती करिता 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि.25(जिमाका):- राज्यातील उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संस्थेमार्फत उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र हे कंपनी कायदा 2013 चे कलम 8 अन्वये स्थापित करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्राकरिता आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करaण्यात येत आहे. त्यामध्ये मल्टी डीसीपलीनरी  कररिकलूम अँड पीडिओलॉजी, इन्क्लुजन डायव्हर्सिटी, लीडरशिप डेव्हलपमेंट, इनोव्हेशन अँड कटिंग टेक्नॉलॉजी, रिसोर्सेस आणि नेटवर्किंग यासाठी समन्वयक पदांची आवश्यकता आहे.  तसेच  सहसंचालक  पदाची ही भरती करण्यात येणार आहे. तरी या विविध पदांच्या भरती करता या http://rusa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहित पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पुणे येथील महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.निपूण विनायक यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here