सहकार शिरोमणी कारखान्याच्या ऊस पुरवठादार सभासद, कामगार व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी जनकल्याण हेल्थ्कार्डचे प्रकाशन व वाटप.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2021-22 मध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद, शेतकरी तसेच कामगारांना वसंतदादा मेडिकल फौंडेशन भंडीशेगांव संचलित जनकल्याण हॉस्पीटल, यांच्या वतीने जनकल्याण हेल्थकार्डचे प्रकाशन कारखान्याचे चेअरमन कल्याण वसंतराव काळे साहेब, वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे, संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, भारत कोळेकर, नागेश फाटे, माजी संचालक इस्माईल मुलाणी, भारतभुसे, पांडुरंग कौलगे, विलास काळे, जयसिंग देशमुख, ठेकेदार तानाजी केसकर, अनिल नागटिळक, माजी पंचायत समिती सदस्य् सुरेश देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव म्हणाले, स्व्.दादांच्या आशिर्वादाने त्यांचा विचाराचा वारसा जपत, सामाजिक बांधिलकीतुन सहकार शिरोमणी कारखान्याच्या माध्यमातुन आम्ही सर्व संचालक सामाजिक कार्यकरीत असून याचाच एक भाग म्हणुन आज जनकल्याण हेल्थ् कार्डचे प्रकाशन करण्यात आले असल्याचे सांगितले.कारखान्याचे ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद तसेच कामगारांना या हेल्थ कार्डचा लाभ घेता येणार असून, याहेल्थ् कार्डमुळे दुर्देवाने आजारी पडुन जनकल्याण हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांस त्यांचे झालेल्या एकूण बिलावर 20 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मागील दोन वर्षामध्ये कोरोना संसर्गजन्य् रोगामुळे लाखो रुपयांचा खर्च करुनही अनेकांचा बळी गेलेला आहे. सर्वसामान्य् गरीब जनतेची कोरोना काळात होणारी परखड पाहुन त्यांना योग्य सल्ला व कमी खर्चात चांगले औषधोपचार मिळावेत यासाठी जनकल्याण हेल्थ कार्ड सुविधा उपलब्ध करण्यात आलीअसून, सदर जनकल्याण हेल्थ् कार्डचा लाभ दिलेल्या तारखे पासून एक वर्षा पर्यत घेता येणार असून, सदर कार्डचा लाभ सर्व ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद व कामगारांनी घ्यावा असेही सांगितले.

आज पर्यत कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्या वतीने जिल्हयातील विविध धर्माच्या लोकांकरीता सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे पार पाडले आहेत. तसेच आखाडी कुस्त्या, सर्वरोग निदानआरोग्य शिबीर, शेतकरी मेळावे, रक्तदानशिबीर इ. विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातुन राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी कले,सदर प्रसंगी वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे यांनी 2007 साला पासून जनकल्याण हॉस्पीटल मार्फत रुग्णांची सेवा करण्यात येतअसून, कोणीही आजरी पडू नये ही माझी मनापासून इच्छा असून, दुर्देवाने आजारी पडल्यास सर्वसामान्य् गोर गरिबांवर चांगले औषधोपचार होवुन, अवाढव्य् खर्च होवु नये यासाठी जनकल्याण हेल्थ् कार्ड काढण्यात आले असल्याचे सांगुन जनकल्याण हॉस्पीटलमध्ये रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोई सुविधांची माहिती देवुन मार्फत मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जनकल्याण हॉस्पीटल मध्ये विविध आजार व ऑपरेशनवर तसेच महात्मा जोतीबा फुले, जनआरोग्य् योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य् योजना विविध आरोग्य् विमा योजना इ. सुविधा उपलब्ध् असल्याचे सांगितले. यावेळी सुरेश देठे, ईस्माईल मुलाणी, नागेश फाटे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, चिफ अकौंटंट बबन सोनवले, टेक्निकल जनरल मॅनेजर प्रकाश तुपे, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळुमकर, डिस्टीलरी मॅनेजर पोपटराव घोगरे, को-जन मॅनेजर संभाजी डुबल, अधिकारी कर्मचार व ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here