भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंढरपूर ते सांगोला रस्त्यसाठी रस्ता रोको आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर ते सांगोला या रस्त्याचे काँक्रीटकरणाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजिक वनविभागाच्या हद्दीतून हा रस्ता जात असल्याने या ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय धोकादाय झाला असून वाहनांच्या वर्दळीमुळे प्रचंड धुळीचे लोट निर्माण होत असल्याने चित्र दिसून येते. तसेच हा रस्ता खराब झाला असल्याने वाहनांचा वेग कमी होत असून त्या खराब रस्त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम वन विभाग व राज्यसरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने प्रलंबित राहिलेला असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवीतास धोका आहे.
तसेच विधान परिषदेचे आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 ला पंढरपूर सांगोला रोडवरील सातवा मैल येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तसेच गेले दोन वर्षापासून ह्या रस्त्याचे काम रखडलेले असून आ.प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र विकास महामंडळाचे एक्झिक्युटिव्‍ह इंजिनीअर श्री.बारावकर साहेब यांना आंदोलना दरम्यान फोन करून वनविभागाच्या हद्दीतील रस्त्याची परिस्थिती सांगितली व श्री.बारावकर यांनी दोन दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती दिली.
सदर वगविगाच्या हद्दीतील रस्ता दुरूस्त करणेसाठी युवक नेते प्रणव परिचारक यांच्या मार्गदशनाखाली भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वसंत नाना देशमुख, सुभाष मस्के, आप्पासाहेब जाधव, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, रामदास ढोणे, हरी फुगारे, हरी गांवधरे, बाळासाहेब शेख, संतोष देशमुख, हंसराज देशमुख, सुरेश देशमुख, सुनिल भोसले, प्रकाश रूपनर, महादेव लवटे, दत्तात्रय गुरव, दिलीप गुरूव, तसेच खर्डी, शेटफळ, तनाळी, कासेगाव, टाकळी याभागातील शेतकरी व नागरीक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here