पांडुरंग सहकारीचा उद्या थाटात शुभारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूरजिल्ह्यातील अनेक मातब्बर आमदार उपस्थित राहणार.

 

सोलापूर // प्रतिनिधी

श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा 31 वा गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या दिनांक 17.10.2021 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे आमदार,चेअरमन, प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते ऊसाची मोळी गव्हाणी मध्ये टाकून होणार आहे.

पूर्ण क्षमतेने पांडुरंग कारखाना गळीत हंगामासाठी तयार आहे. असे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले. कोरोना चे सर्व नियम पाळून, मास्क लावून, सोशल डिस्टन्स ठेवून सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे. असे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here