देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर मनमोहन सिंग यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मनमोहन सिंग यांच्यावर रुग्णालयात उपचार देण्यासाठी एक वैद्यकीय पथक असणार आहे. एम्सचे डॉ.रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखी खाली हे पथक काम करणार आहे. मनमोहन सिंग यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये त्यावेळी उपचार सुरू होते. ताप असल्याने त्यांनी तातडीनं कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानं त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. मनमोहन सिंग लवकर बरे व्हावेत यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसह समर्थकही प्रार्थना करत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here