माहिती व ज्ञानाच्या आधारावर ममतेचे व मानवतेची जोड देऊन काम करून घेणेची कला अवगत असणारा अधिकारी म्हणजे विठ्ठल जोशी साहेब : ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माहिती व ज्ञानाच्या आधारावर ममतेचे व मानवतेची जोड देऊन काम करून घेणेची कला अवगत असणारा अधिकारी म्हणजे विठ्ठल जोशी साहेब : ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर.

पंढरपूर :- श्री.विठ्ठल जोशी, उपजिल्हाधिकारी यांची कार्यकारी अधिकारी, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर या पदावरून निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा येथे बदली झाली आहे. त्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी वर्गांनी श्री.जोशीसाहेब यांना निरोप समारंभ सोमवार, दि.11/10/2021 रोजी दु.1.00 वाजता श्री.संत तुकाराम भवन येथे आयोजित केला होता. यावेळी ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये निरोप समारंभ खूप कमी अधिका-यांना लाभतो, प्रशासकीय कामात परस्थिती हाताळण्याचे कौशल्य अधिका-यांना प्रशिक्षणात मिळते. पण, माहिती व ज्ञानाच्या आधारावर ममतेचे व मानवतेची जोड देऊन काम करून घेणेची कला अवगत असणारा अधिकारी म्हणजे जोशी साहेब. मंदिर समिती सदस्य, कर्मचारी, भाविक व पत्रकार यांचा समन्वय राखून चांगल्या पध्दतीने काम केले अशी प्रशंसा केली.

            या कार्यक्रमास मंदिर समितीचे सदस्य श्री.संभाजी शिंदे, श्रीमती शकुंतला नडगिरे, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरेगुरूजी, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), नगराध्यक्षा सौ.साधना भोसले तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेकर व ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड, तसेच कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.पृथ्वीराज राऊत, सचिव श्री.विनोद पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक श्री.राजेंद्र सुभेदार यांनी केले. कर्मचा-यांच्या वतीने मा.श्री.विठ्ठल जोशी व सौ.अश्विनी जोशी यांचा येथोच्छित सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील कर्मचा-यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मंदिर समितीचे सदस्य व सल्लागार परिषदेचे सदस्य तसेच कर्मचारी श्री.विनोद पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये श्री.विठ्ठल जोशी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

            श्री.विठ्ठल जोशी साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये मंदिर समितीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांमध्ये मंदिर समितीचे मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्य महोदय तसेच कर्मचा-यांचे खुप चांगले सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्यानेच दोन वर्षाची कारकिर्द यशस्वी झाली. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर अनेक महत्वाची पदे भुषविता आली. तरी माझ्या आई-वडिलांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.पांडूरंगाच्या मंदिरात सेवा करायला मिळावी हे त्यांचेच स्वप्न होते. सुदैवाने हे स्वप्न कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झाल्यावर पूर्णत्वास आले. या पदावर काम करताना दरवर्षी 10 ते 12 लाख लोकांची आषाढी वारी साजरी करता आली नाही, याची खंत मनात आहे. परंतू गेल्या 28 युगांमध्ये झाली नाही, अशी अभूतपूर्व जागतिक महामारीच्या काळातील दोन आषाढी वारीचे संयोजन मला करावे लागले. असंख्य निर्बंधांतून वाट काढीत संख्यात्मकदृष्ट्या अत्यल्प भासणारी मात्र भक्तीरसाने ओतप्रोत भरलेली आषाढी वारी आयोजित करणे माझ्या नशिबी असावे ! आजवर केवळ तोंडी पाळल्या जाणा-या असंख्य प्रथा व परंपरा शासन दरबारी मांडून त्यावर शासकीय मोहोर उठविता आली याचं आगळं-वेगळं समाधान मला लाभलं. मंदिरात उतरावयाच्या जिण्याच्या पाय-या सुलभ करण्यापासून ते देखण्या विठूरायाच्या दिमाखदार पोशाखापर्यंत व्यक्तीश: लक्ष देता आलं. प्रातिनिधिक वारी घराघरा पर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक समाज-माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करता आला. नैराश्य व नकारात्मकेच्या वातावरणा बाहेर करोडो मराठी जणांना आणण्याकरिता मंदिरातील सकारात्मक ऊर्जा विविध मार्गाने लोकापर्यंत पोहविता आली.

            श्री.जोशी साहेब यांनी तक्रार करण्यासाठी आलेल्या भाविकांची समजूत काढून श्रींचे दर्शन घडविले व त्या भाविकांने मंदिर समितीस अंदाजे 20 लक्ष रूपयांचा ध्वजस्तंभ भेट दिला. मंदिर समितीच्या माध्यमांतून कोरोना कालावधीत उपजिल्हा रूग्णालय यांना हायफ्लो ऑक्सीजन मशिन, रग्णवाहिका, निराधार व्यक्तींना फुड पॅकेट, भटक्या जनावरांना चारा, परप्रांतीय मजूरांना निवास व भोजन व्यवस्था, कोव्हीड केअर सेंटरसाइी भक्तनिवास, तरटी/कोन्हापात्रा वृक्षाचे वृक्षारोपन, दैनंदिनीमध्ये आम्रलाग्र बदल, श्री.तेहतीस कोटी देवता मंदिर जिर्णोद्वार, कर्मचा-यांना कर्तव्य सुची दिली, वनगाईंना चारा व पाण्याची सोय तसेच कर्मचा-यांना विमा कवच उपलब्ध करून दिली. श्रींच्या मुर्तीचे संवर्धन, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनासाठी मंदिराचा सर्वकष विकास आराखडा, मंदिरातील बॅरीकेटींग, प्रथमोचार केंद्र, मोबाईल बंदी, श्रींचे वेगवेगळ्या प्रतिमा, दानशुर देणगीदार मार्फत परिवार देवतांचा जिर्णोद्वार, कर्मचा-यांना गणवेश, भंग पावलेल्या मुर्तींची प्रतिष्ठापना, मंदिराच्या परंपरेत सातत्य, मंदिर बंद कालावधीत श्रींचे लाईव्ह दर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक यात्रा आयोजित करून परंपरा जोपासल्या अशी अनेक कामे सांगता येतील.

            कायद्यांचे सखोल ज्ञान, उत्कृष्ट वक्तृत्व, सुत्रसंचालन, साहित्य, कला, क्रिडा, अध्यात्मामध्ये रूची, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील भिंत संपऊन सर्वांना सोबत घेऊन काम करणा-या, या प्रामाणिक व चारित्र्य संपन्न अधिका-याला निरोप देताना सर्व कर्मचारी भावूक झाले होते.

            या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सुधाकर घोडके व शेवटी श्री.संदीप कुलकर्णी गुरूजी यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले. सदरचा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पाडण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here