किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी ( २ ऑक्टोबर) एनसीबीने (NCB) छापा टाकला. या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानदेखील सहभागी आहे. त्यामुळे आर्यन सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. एनसीबीने आर्यनसह अन्य जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांपैकी २०(बी) या कलमात १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे आर्यनवरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला १० वर्षांचा कारावास होऊ शकतो.

१० वर्ष शिक्षेची तरतूद

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सगळ्यांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गंत (एनडीपीएस अॅक्ट) कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह अन्य कलम लावण्यात आले आहेत. २० (बी)   कलमांतर्गंत जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो किंवा दिलेल्या नियमांचे वा अटींचे पालन करत नाही. थोडक्यात, मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात- निर्यात केल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

आर्यनला होऊ शकते १ वर्षापर्यंत शिक्षा?

आर्यनवर केवळ एनडीपीएसच्या कलम २७ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला २० हजार रुपये दंड आणि १ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here