डॉक्टर अनिल व्यंकटेश कुलकर्णी अपहरण प्रकरणातील सातजण जेरबंद – लुटलेली रक्कम, कार, मोटर सायकल,आणि मोबाईल स्थानिक गुन्हे शाखेने केली जप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डॉक्टर अनिल व्यंकटेश कुलकर्णी अपहरण प्रकरणातील सातजण जेरबंद – लुटलेली रक्कम, कार, मोटर सायकल,आणि मोबाईल स्थानिक गुन्हे शाखेने केली जप्त

सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, चारच दिवसांत सर्व आरोपी गजाआड.

वडाळा येथील डॉक्टर अनिल व्यंकटेश कुलकर्णी यांचे अपहरण करून त्यांना गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.  त्यांच्याकडील पाच लाख 88 हजार चारशे वीस रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेणाऱ्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या मुसक्‍या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात सोडलेली रक्कम, एक इनोवा कार, एक मोटरसायकल, सात मोबाईल, असा आठ लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

विकास सुभाष बनसोडे (वय 31,)  सिद्धार्थ उत्तम सोनवणे (वय 42 रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे) रोहित राजू वैराळ (वय 28, रा. वडगाव बुद्रुक, भवानीनगर, पुणे, सध्या रा. आंबेगाव)  रामचंद्र बालाजी कांबळे (वय 28, रा. हवेली जिल्हा पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय २१ रा. जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद) भारत दत्तात्रय गायकवाड (वय ३१) मुराद हनीफ शेख (वय ३१) (दोघेही रा. वडाळा तालुका उत्तर सोलापूर) या सात जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींना पोलिसांनी कोर्टापुढे उभे केले असता सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे राहणारे डॉक्टर अनिल कुलकर्णी यांचे वडाळा येथे मोठे हॉस्पिटल व पेट्रोल पंप आहे 21 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते एम एच-13,बी.एन.9367 या कारमधून वडाळा कडून सोलापूरला जात होते. बीबीदारफळ ते कोंडी रस्त्यानेएम.आय. डी.सी. क्रॉस रोडवर आले असता, दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीला इनोवा कार आडवी लावून  डॉक्टर कुलकर्णी यांना गाडीतून उतरून घेतले, आणि इनोव्हा मध्ये बसवले त्यांना गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, कोयत्याने वार केले. काठीने आणि हॉकी स्टिकने मारहाण केली व एक कोटीची खंडणी मागितली. डॉक्टरांनी पैसे नाहीत असे म्हटल्याने डॉक्टर जवळील पाच लाख  88 हजार चारशे वीस रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यांना वारजे माळवाडी पुणे येथे गाडीतून खाली ढकलून दिले या प्रकरणी डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेस  हा गुन्हा वडगाव सिंहगड रोड पानमळा पुणे येथील गुन्हेगारांनी केल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली तर दोन आरोपींना वडाळा येथून अटक केली हि कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे  हवालदार नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले अक्षय दळवी चालक समीर शेख यांनी पार पाडली 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here