शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

 

सोलापूर // प्रतिनिधी 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात 5 वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकाचा सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शमा पवार यांच्या हस्ते कल्याणकारी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी पोलीस निरिक्षक रणजीत माने, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेळकंदे, महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त मेजर एस.एस.खांडेकर उपस्थित होते.

श्रीमती पवार यांनी माजी सैनिकाच्या आणि विधवांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली.

प्रास्ताविक श्री. खांडेकर यांनी केले तर आभार अनिल मेंगशेट्टी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, संजीव काशीद, सतिश रासकर, गुरूनाथ कुलकर्णी, दिनेश नागणे, लक्ष्मण कोळी, आप्पासाहेब कोडग, उमेश राठोड, एम.यु.मुल्ला, राजेसाहेब शेख, आशादेवी किवडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रभारी नायब तहसीलदार संदीप लटके यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here