पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळ श्री गणरायांचे पंचामृत कुंडामध्ये विसर्जन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळ श्री गणरायांचे पंचामृत कुंडामध्ये विसर्जन

 

सोलापूर शहरातील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळ व पदमशाली युवक संघटनेच्या वतीने संयुक्तरित्या प्रतिष्ठापना केलेल्या पर्यावरणपूरक श्री. गणेशमूर्तीचे अनंत चतुर्थी निमित्त कन्ना चौकातील मद्दा मंगलकार्यालय येथे श्री गणेश मूर्तीचे पूजन पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेशअण्णा कोठे व पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोस्तव महामंडळाचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मद्दा मंगलकार्यालय येथेच श्री गणरायांचे पंचामृत कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले.

यावेळी पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंगळाचे अध्यक्ष श्री शेखर कटकम म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पूर्व भागातील जवळपास पाचशे मंडळांनी गणेशोस्तव अत्यंत साध्या पद्धतीने व कोरोना प्रादुभवाचे तसेच शासनाचे नियम पाळून गणेशोस्तव साजरा केला आजही अनंत चतुर्थी दिवशी शासनाच्या नियमानुसार त्यांनी नेमलेल्या संकलन केंद्रावर किंवा घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करण्यात यावे असे आवाहन यावेळी केले. पूर्व भागातील अनेक गणेशमूर्ती संकलन केंद्रावर मोठ्या भक्तिभावाने भाविक मूर्ती संकलन करत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या नियमानुसार पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व पदमशाली युवक संघटनेकच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणरायांचे आज मद्दा मंगलकार्यालय येथे पंचामृत कुंड तयार करून येथेच विसर्जन केले आहे.

यावेळी विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विष्णू कारमपुरी महाराज, विनोद देविदास, पदमशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गडडम, SBC संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक इंदापुरे, नगरसेवक प्रथमेश कोठे, पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोस्तव महामंडळ अध्यक्ष शेखर कटकम, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, माजी नगरसेवक उमेश मामड्याल, व्यंकटेश नंदाल, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, प्रथमेश कन्ना, महाकांळी येलदी, सागर मामडयाल, मुरलीधर कणकी, अंबादास आडम, नवनाथ साका, बाळकृष्ण इप्पाकायल, सुधाकर नराल, गुरुनाथ कोळी, राम गडडम, सूर्यकांत जिंदम, गोविंद चिंता, साईनाथ मूनगापाटिल, निखिल चाटला, मधुकर वड्डेपल्ली, बोगम यांच्यासह इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here