सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बालविवाह पोलिसांच्या सत्तेमुळे रोखला गेला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बालविवाह पोलिसांच्या सत्तेमुळे रोखला गेला.

 

अल्पवयीन नवरीला लपवून ठेऊन बालविवाह उरकण्याचा प्रयत्न करण्यात आला पण जिल्हा बाल समिती आणि पोलिसांपर्यंत आधीच ही खबर पोहोचल्याने हा विवाह रोखण्यात आला आणि अल्पवयीन वधूला बालगृहात दाखल करण्यात आले.

बालविवाह विरोधी कायदा कडक केला असताना आणि अशा विवाहाचे तोटे असतानाही बालविवाहाच्या घटना घडताना दिसतात. ग्रामीण भागात अशा बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. पंढरपूर तालुक्यातही होऊ घातलेला बालविवाह प्रशासनाने ऐनवेळी रोखला असल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील एका गावात छोटासा मंडप टाकून एका अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात होता पण आधीच ही खबर जिल्हा बाल समिती आणि पोलीस यांच्यापर्यंत पोहोचली होती.

नवऱ्या मुलाकडे आणि वस्तीवर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. छोटा मंडप टाकून केवळ जवळच्या नातेवाईकानाच या विवाहासाठी निमंत्रित करण्यात आले होते. कोणाला याची काही खबर नसल्याचा भ्रम असला तरी चाईल्ड लाईन वरून जिल्हा बाल समितीला या विवाहाबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे पंढरपूर तालुका पोलिसांना घेऊन पंढरपूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी सरडे, संरक्षण अधिकारी घाडगे, निर्भय पथक, चाईल्ड लाईनचे अधिकारी या वस्तीवर पोहोचले.

 

 

 

घटनास्थळी जाऊन या अधिकाऱ्यांनी अंदाज घेतला पण प्रथमदर्शनी त्यांना तसे काही दिसून आले नाही. छोटासा मंडप असला तरी नवरी मुलगी कुठेच दिसत नव्हती. मुलीच्या वडिलानेही या पथकाची पद्धतशीर दिशाभूल केली. विवाहाचा नव्हे तर साखरपुड्याचा हा कार्यक्रम असल्याची बतावणी पथकाला करण्यात आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आपल्या पद्धतीने चौकशी सुरु करताच सगळा प्रकार उजेडात आला. नवरीच्या पित्याने सगळी सत्य हकीगत सांगितली. त्यानंतर मात्र बालवधूला ताब्यात घेण्यात आले आणि होऊ घातलेला बालविवाह रोखला गेला. त्यानंतर मात्र परिसरात या घटनेची माहिती पसरली आणि चर्चा सुरु झाली.

 

 

नवरीला लपवले !

आठवीपर्यंत शिक्षण घेतलेली ही मुलगी गेल्या दोन वर्षांपासून घरीच होती, तिच्या मामाच्या मुलाशी तिचा विवाह निश्चित करण्यात आला होता. सगळे काही अत्यंत गोपनिय पद्धतीने सुरु होते. पथक पोहोचल्यावरही त्यांना काही थांगपत्ता लागू दिला नाही. अल्पवयीन नवरी कुठेच दिसत नव्हती त्यामुळे आणखी गूढ निर्माण झाले होते. अखेर कसून केलेल्या चौकशीत सत्य बाहेर आले. या मुलीला शेजारीच असलेल्या चुलत भावाच्या घरात लपवून ठेवले असल्याचे आढळून आले. निर्भय पथकाच्या मदतीने तिला समोर आणण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here