महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी प्रमोद (काका) बाबर यांची निवड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी प्रमोद (काका) बाबर यांची निवड!

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालक पदी मौजे पुळूज येथील प्रसिद्ध प्रगतशील द्राक्ष बागायतदार प्रमोद (काका) बाबर यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र त्यांना द्राक्ष बागायतदार संघाकडून देण्यात आले आहे

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायती असून याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार असून या द्राक्ष बागायतदारांच्या अनेक अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे येथे असून याच्या संचालकपदी पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील प्रमोद (काका) बाबर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर ठिक ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे याबाबत त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता इथून पुढे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागायतदारांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार असून द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सर्वांच्या अडीअडचणी प्रामुख्याने सोडणार असल्याचे यावेळी प्रमोद काका बाबर यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here