आंतरजिल्हा बदलीसाठी 11 हजार शिक्षक इच्छुक! दिवाळीनंतर बदल्या

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आंतरजिल्हा बदलीसाठी 11 हजार शिक्षक इच्छुक! दिवाळीनंतर बदल्या

 

 

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी राज्यातील अंदाजित 11 हजार शिक्षक (Teachers) इच्छुक आहेत. कोरोना (Covid-19) काळात आपल्या जिल्ह्यात जाणारे इच्छुक खूपच आहेत. आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून आता ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र स्वॉफ्टवेअर विकसित केले असून, दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

नोकरीला लागताना सर्व प्रकारच्या अटी व शर्थी मान्य करून अनेकजण दुसऱ्या जिल्ह्यात सहशिक्षक पदावर रुजू झाले. पाच वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्यानंतर संबंधित शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरतो. दुसरीकडे, तो शिक्षक ज्या प्रवर्गातून त्या ठिकाणी रुजू झाला आहे, त्या प्रवर्गाची जागा रिक्‍त असल्यानंतर त्याला आंतरजिल्हा बदलीतून संधी दिली जाते. मात्र, अनेक शिक्षकांनी बदलीसाठी प्रयत्न करूनही त्यांना त्यांच्या जिल्ह्यात बदली मिळालेली नाही. दुसरीकडे, जिल्हांतर्गत बदल्या दरवर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून केल्या जात होत्या. मात्र, त्यामध्येही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी काही शिक्षकांनी थेट ग्रामविकास विभागाकडे केल्या. त्यामुळे आता आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाइन नव्हे तर ऑनलाइन पद्धतीनेच होतील, असेही मुश्रीफ यांनी “सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक स्वतंत्र स्वॉफ्टवेअर तयार केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने शिक्षकांना पारदर्शक बदल्यांची गिफ्ट दिली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

आंतरजिल्हा बदल्यांसाठी इच्छुक शिक्षकांची मोठी संख्या आहे. त्यांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन होतील. दिवाळीपूर्वी त्यांच्या बदल्यांचा विषय मार्गी लागेल. तसे नियोजन सुरू आहे.
-हसन मुश्रीफ

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here