अनिल परब यांचे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच- किरीट सोमय्या

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अनिल परब यांचे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच- किरीट सोमय्या

कणकवली – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज येथे दिले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले असून ते आता गायब केले आहेत अशीही टीकाही त्यांनी केली.

सोमय्या म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून दापोली समुद्र किनारी दोन बंगले बांधले. यातील एक रिसॉर्ट १७ हजार स्क्वेअर फुटाचे आहे. दुसर्‍या बंगल्याचा तपशील अजून यायचा आहे. समुद्रपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हे बांधकाम असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत पाडावेच लागणार आहे. मिलिंद नार्वेकर यांना आपले बांधकाम तोडावे लागले. त्याच धर्तीवर परब यांनाही आपले बांधकाम तोडावेच लागणार आहे. मुख्यमंत्री यांनी ते बांधकाम वाचून दाखवावे. त्यांना माझे खुले आव्हान आहे.

पुढे सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री मोठे घोटाळेबाज आहेत. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे तब्बल १९ बंगले बांधले. एवढेच नव्हे तर ते गायबही केले आहेत. मात्र आम्ही या अनधिकृत बांधकामांचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here