फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन
सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली आहे.”कोरोनाव्हायरस एक अद्रुश्य शत्रू” या विषयांतर्गत लॉकडाऊनला न जुमानता विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा विकास होण्यासाठी ऑनलाइन खुली स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे तीन गटांमध्ये विभाजन केले आहे. प्रथम गट इयत्ता पहिली ते चौथी, द्वितीय गट इयत्ता पाचवी ते आठवी व तृतीय गट इयत्ता नववी ते बारावी. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक तयार करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.तसेच विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल .स्पर्धेची तारीख शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१ असेल स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी रोख रकमेची दोन बक्षिसे दिली जातील. प्रथम बक्षीस १००१ रूपये व द्वितीय बक्षीस ७०१ रुपये असतील अधिक माहितीसाठी श्री सतीश देवमारे सर-९९७५३७५०७० श्री निसार इनामदार सर-९९७५८१३५३१,श्री निलेश ताकभाते -९८२२३६७४८६ यांच्याशी संपर्क साधावा.