लाडक्या सीएमकडून तुम्ही मंजूरी आणा; आम्ही केंद्रातून आणू; भाजपचा सल्ला

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लाडक्या सीएमकडून तुम्ही मंजूरी आणा; आम्ही केंद्रातून आणू; भाजपचा सल्ला

 

शिवसेनेचे खासदार व आमदारांनी नौटंकी करण्याऐवजी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांकडून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी मंजूरी मिळवावी. केंद्रीय पातळीवरुन आम्ही परवानगी मिळवून आणू. त्यासाठी परभणीकरांना कोणतेही आंदोलन करावे लागणार नाही, असे भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. मेघना बोर्डीकर व महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी एका पत्रकार परिषदेतून म्हटले.
परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी, पुढार्‍यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सरकार दरबारी आपले वजन खर्ची करावे, यासाठी ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे तर आमदार बाबाजानी दुर्राणीव माजी महापौर प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे भक्कम असा पाठपुरावा करावा. तसेच शिवसेनेचे खासदार व आमदार यांनी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांकडून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी मंजूरी मिळवावी व महाविद्यालयाचा प्रस्ताव त्वरीत केंद्राकडे पाठविण्यास भाग पाडावे, असे मत व्यक्त करीत या दोघांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत मंजूर होण्याबाबत सत्तारुढ पक्षाचेच लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडले आहेत, असा आरोप केला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यरत असतांना परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता समिती गठीत केली. त्या समितीने दौरा करीत तात्काळ सकारात्मक अहवाल सादर केला. परभणी पात्र आहे, हे स्पष्टपणे नमूद केले होते, असे म्हणत या दोघांनी शिवसेनेच्या दोघा लोकप्रतिनिधींनी लाडक्या मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळवून आणावी, आम्ही केंद्रीय स्तरावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या माध्यमातून परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी मिळवून देवू, या करीता परभणीकरांना कोणतेही आंदोलन करावे लागणार नाही, याची काळजी घेवू, असा विश्‍वासही व्यक्त केला.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके, महापालिका सदस्य मधूकर गव्हाणे, रितेश जैन, संजय रिझवाणी,दिनेश नरवाडकर, एन.डी. देशमुख आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here