श्री पांडुरंग कारखान्याने एफ.आर.पी. मधील  पोळा सणासाठी प्रती मे.टन रु.100/- प्रमाणे ऊस बिलाचा हफ्ता सभासदांच्या खात्यात केला वर्ग!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग कारखान्याने एफ.आर.पी. मधील 
पोळा सणासाठी प्रती मे.टन रु.100/- प्रमाणे ऊस बिलाचा हफ्ता सभासदांच्या खात्यात केला वर्ग!

 

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.100/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू.10कोटी जमा केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यास पोळा, दिपावली सारख्या सणासाठी योग्यवेळी पैसे उपलब्ध करुन दिलेले आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक मालक यांनी पाठीमागील वर्षी कोरोनामुळे पुणे येथील हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेत असताना शेतकऱ्यांना पोळा सणासाठी ऊस बिलाचा हप्ता देणेच्या सुचना कार्यकारी संचालक यांना दिल्या होत्या त्यावेळी मोठया मालकांच्या सुचनेप्रमाणे पोळा सणासाठी कोरोनाच्या परस्थितीमुळे अर्थीक अडचणी असताना सुध्दा ऊस दराचा हप्ता सत्वर देणेत आला होता त्याचप्रमाणे ही परंपरा कायम ठेवीत ”शेतकरी हिताय, कामगार सुखाय” या उक्ती प्रमाणे मोठया मालकांच्या आदर्शाचा वारसा कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ , कार्यकारी संचालक, अधिकारी,कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी यांच्या सहकार्याने पुढेही असाच सुरु राहील असे कारखान्याचे चेअरमन आ.श्री.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.
कारखान्याचे चेअरमन आ.मा.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम 2020-21 अत्यंत उत्कृष्ठपणे चालला असून या हंगामात कारखान्यास ऊसाची कमतरता जानवली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून या हंगामात कारखान्यास ऊस देवून सहकार्य केले आहे. आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या सुयोग्य नियोजनामुळे गळीत हंगाम 2020-2021 मध्ये कारखान्याने जिल्हयात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळविला असून जिल्हयात प्रथम क्रमांकाचा ऊस दरही दिला आहे. त्याच बरोबर येणाऱ्या हंगामात आसवनी प्रकल्प व इथेनॉल निर्मीती प्रकल्प क्षमतेत 90 के.एल.पी.डी. ने वाढ होणार असून कारखान्याचेही गाळप प्रती दिन 7,000 मे.टनाने होणार आहे. गाळप हंगाम 2020-21 मध्ये कारखान्याने 10.06 लाख मे. टन ऊस गाळप करून 11.41% सरासरी साखर उताऱ्याने 11.13 लाख क्विं. साखरेचे उत्पादन घेेवून कारखान्याने उद्दीष्ठपुर्ती केली आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कोवीड-19 च्या परिस्थितीमुळे अर्थिक संकटात असताना श्री पांडूरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या ऊसास पोळा सणासाठी प्रती मे. टन रू.100/- प्रमाणे ऊस बील दिलेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांना महत्वाचा असणारा पोळा सण हा मोठ्या आनंदात साजरा करणेसाठी पैशाची गरज असताना कारखान्याने ऊस बिलाची रक्कम बँकेत खात्यावर वर्ग केली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

चौकट:-

गाळप हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार कारखान्याची FRP रु. 2431/- प्रती मे. टन असून कारखान्याने या गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसास पुर्वीच पहिला हप्ता रु. 2100/- प्रति मे.टन प्रमाणे एकरक्कमी ऊस बिल दिले असून कारखाना बंद झाल्याबरोबर रू 131/- प्रती मे.टन प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे आणी आता पोळा सणासाठी शेतकऱ्यांना रु.100/- प्रमाणे ऊस बील देत आहोत. आतापर्यत शेतक-यांना प्रती मे.टन रू 2331/- प्रमाणे उसदर मिळाला असून उर्वरीत FRP ची रक्कमही लवकरच देणार आहे. केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार शेतक-यांना आतापर्यंत 96 % FRP ची रक्कम अदा केली आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, गळीत हंगाम 2021-22 हा पूर्ण कार्यक्षमतेने चालविणेसाठी कारखान्याचे चेअरमन आमदार *मा.श्री.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन मा.श्री.वसंतराव देशमुख, कारखान्याचे संचालक, अधिकारी व कामगार वर्गाच्या सहकार्याने कारखान्यामधील सर्व कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पुर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वहातुक यंत्रणा सक्षमपणे उभारली असून त्यांना पहिल्या ऍ़डव्हान्स हप्त्याचे वाटपही पुर्ण केलेले आहे.

डॉ.यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here