आरोपीला फाशी होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्यासाठी प्रयत्न करणार:-मा.खा. धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आरोपीला फाशी होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्यासाठी प्रयत्न करणार:-मा.खा. धनंजय महाडिक

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनाळी येथील लहान चिमुकला वरद पाटील याचा दिनांक 27 ऑगस्ट रोजी निर्घुणपणे खून करण्यात आला होता. ती घटना नंतरच उघडकीस आली होती त्यानंतर त्या कुटुंबीयांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसरला होता. त्या कुटुंबीयांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांत्वन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबांना धीराचा आधार देणे फार गरजेचे होते हे कृत्य करणाऱ्या त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुत्तीसाठी मी प्रयत्न करेल. असे यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक व भूषण पाटील यांनी त्या कुटुंबीयांना सांगितले त्याच प्रमाणे या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करीन असे या वेळी महाडिक यांनी त्या कुटुंबियांना धीर देताना सांगितले. यावेळी मयत वरद पाटील यांचे वडील रवींद्र पाटील व सोनाळी गावातील समस्त ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी सोनाळी येथील ग्रामस्थांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय महाडिक यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यावेळी सुरेश चौगुले मधुकर भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य भुषण पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुकडे, डॉक्टर युवराज पाटील एमएम चौगुले बाळासाहेब हिरगुडे यासह गावातील असंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here